मातापित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजय गांधी परिवाराच्या वतीने वृद्धाश्रमात अन्नदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 17, 2021

मातापित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजय गांधी परिवाराच्या वतीने वृद्धाश्रमात अन्नदान

 मातापित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ विजय गांधी परिवाराच्या वतीने वृद्धाश्रमात अन्नदान

नेवासा ः मातापित्यांच्या स्मृती प्रित्यर्थ नेवासा येथील पत्रकार विजय गांधी परिवाराच्या वतीने वृद्धाश्रमात अन्नदान करून  आईवडिलांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. वृद्ध निराधारांना सांभाळणार्‍या शरणपूर वृद्धाश्रमाचे कार्य कौतुकास्पद असून वृद्धाश्रमाच्या उन्नतीसाठी व्यापार्‍यांच्या मार्फत हातभार लावू असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार व व्यापारी विजय गांधी यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्थळ दुमालाचे माजी सरपंच भाऊसाहेब वाघ हे होते तर प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ शिंदे, लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या संचालिका रत्नमाला गांधी, युवा व्यापारी अभिजित गांधी, वर्षाताई गांधी, वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर, वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यावेळी उपस्थित होते.
यावेळी वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक संतोष मगर यांनी स्वागत केले.वृद्धाश्रम अध्यक्ष रावसाहेब मगर यांनी प्रास्ताविक केले.त्यात त्यांनी वृद्धाश्रम दिनचर्या विषयी माहिती दिली तसेच वृद्धाश्रमाच्या नियोजित जागेच्या खरेदीसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. यावेळी स्वर्गीय हरीचंद गांधी व चंचलाबाई गांधी यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलतांना जेष्ठ पत्रकार विजय गांधी म्हणाले की कोणतेही शासकीय अनुदान नसतांना स्वबळावर चालणार्‍या वृद्धाश्रमाच्या कार्याचे कौतुक केले तसेच मी माझ्या व्यापारी बांधव व परिवाराच्या वतीने वृद्धाश्रमासाठी निश्चितच योगदान देण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही देत त्यांनी आईवडीलांच्या स्मृती प्रित्यर्थ केलेल्या अन्नदानामुळे गांधी परीवाराला आत्मिक समाधान मिळाले असल्याचे स्पष्ट केले. वृद्धाश्रमाच्या अन्नपूर्णा विभागाच्या प्रमुख ज्योतीताई मगर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here