नामांकीत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागेल सीईटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

नामांकीत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागेल सीईटी

 नामांकीत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना द्यावी लागेल सीईटी


हावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रत्यक्ष परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला गेला. यावर्षी विक्रमी असा 99.95 टक्के इतका निकाल लागला याचाच अर्थ जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामुळेच 11 वि ची प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होईल ? सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने आपल्या पाल्याला 11 वि च्या वर्गात प्रवेश मिळेल का? पसंतीचे महाविद्यालय मिळेल का ? त्यासाठी काय करावे लागेल? यासारखे अनेक प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे शालेय शिक्षण विभागाने दिली आहेत त्यामुळे पालकांच्या मनातील संभ्रम कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. शैक्षणिक वर्ष 2021 - 22 साठी इयत्ता 11 वि ची प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.  21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 च्या दरम्यान 11 वि ची सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 20 जुलै सकाळी 11.30 पासून ते 26 जुलैपर्यंत परीक्षा देऊ इच्छिणार्‍या  विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरता येईल. महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरता येईल. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. पोर्टलवर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना बोर्डाचा बैठक क्रमांक भरावा लागेल. ही परीक्षा ऐच्छिक असल्याने परीक्षा द्यायची की नाही असे दोन पर्याय दिले जातील. यातील योग्य पर्याय निवडून फॉर्म भरावयाचा आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या सामाईक परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना मात्र अर्ज नोंदणीसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. ही परीक्षा 100 गुणांची असणार असून गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी 25 गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर  पद्धतीने घेतली जाणार आहे.  11 वि प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक  प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ  महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच 11 वि च्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये सामाईक  प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10 वि च्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील. यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना 90 टक्के, 100 टक्के गुण मिळाले. मात्र इतके गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पहिल्यांदाच 11 वि सामाईक परीक्षा (सीईटी ) द्यावी लागणार आहे. त्यामुळे 10 वि मध्ये चांगले गुण मिळाले म्हणून हुरळून न जाता सामाईक परीक्षेतही चांगले गुण मिळवावे लागणार आहेत. कारण त्या गुणांच्या आधारेच मेरिट लिस्टनुसार नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे.

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

9922546295

No comments:

Post a Comment