शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या अभिवृद्धीसाठी समिती स्थापन ः महापौर वाकळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 1, 2021

शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या अभिवृद्धीसाठी समिती स्थापन ः महापौर वाकळे

 शहराच्या सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या अभिवृद्धीसाठी समिती स्थापन ः महापौर वाकळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नागरी सुविधा देत असताना शहराच्या नाट्य,चित्रपट, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचाही विकास व्हावा कलाकार आणि खेळाडू यांना त्यांच्या विकासासाठी उपाययोजना, स्पर्धात्मक कार्यक्रम राबविणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने अहमदनगर महानगरपालिका सांडकृतीक व क्रीडा समिती स्थापन करून जेष्ठ नाट्यकर्मी, खेळाडू, विवीध संस्था संघटनांचे  तज्ञ प्रतिनिधी यांचा या समितीमध्ये समावेश आहे अशी माहिती महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
अहमदनगर महापालिका सांस्कृतिक व क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी युवा नाट्यकर्मींच्या अमित गटाणे यांना निवडीचे पत्र महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी भाजपा शहर अध्यक्ष महेंद्र गंदे, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, मा. सभागृहनेते मनोज दुल्लम, भाजप मध्य मंडळ अध्यक्ष अजय चितळे,उदया कराळे,नितीन बारस्कार, सतीश शिंदे,पुष्कर कुळकर्णी, अभिजीत चिप्पा, किशोर कानडे आदी उपस्थित होते.
समितीचे अध्यक्ष युवा नाट्यकर्मी श्री.अमित शशिकांत गटणे हे असून मा.उपायुक्त श्री.यशवंत डांगे पदसिद्ध सचिव आहेत तर सन्माननीय सदस्य म्हणून श्री.शशिकांत नजान (समन्वयक अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि महापालिका प्रतिनिधी), प्रा.श्री.मधुसूदन मुळे (जेष्ठ नाट्यकर्मी), श्री.सतीश लोटके (नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई), श्री.अमोल खोले (अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखा), श्री.पी.डी. कुलकर्णी (जेष्ठ नाट्यकर्मी), श्री.श्याम शिंदे (राष्ट्रवादी सांस्कृतिक जिल्हा प्रमुख), श्री.श्रेणीक शिंगवी (जेष्ठ नाट्यकर्मी) श्री.सुमित कुलकर्णी (जेष्ठ नाट्यकर्मी), श्री.स्वप्नील मुनोत (युवा नाट्यकर्मी) श्रीमती अंजली वल्लाकट्टी, श्री.विराज मुनोत (युवा नाट्यकर्मी) श्री.निलेश सुभाष जाधव, श्रीमती शारदा होशिंग यांची निवड करण्यात आली आहे असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संगितले. यावेळी बोलताना अमित गटणे म्हणाले की, महानगरपालिकेचे हक्काचे अद्यावत नाट्यगृह बांधकाम पूर्ण होऊन त्यात कलाकारांना सुविधा बाबत तसेच पिंपळगाव माळवी येथील नियोजित फिल्म सिटी बाबत पाठपुरावा करू तसेच नाट्य,सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रासाठी स्पर्धात्मक कार्यक्रम राबविणे कलाकार खेळाडू आणि महापालिका प्रशासना यांच्यात समन्वय साधने या साठी ही समिती कार्य करणार आहे.
सांस्कृतिक आणि क्रीडा समिती अध्यक्ष,सचिव आणि समिती सदस्यांचे मा.खासदार श्री.सुजय विखे, मा.आमदार श्री.संग्राम भैय्या जगताप, आयुक्त मा.श्री.शंकर गोरे,उपमहापौर श्रीमती मालनताई ढोणे,स्थायी समिती सभापती श्री. अविनाश घुले, सभागृह नेते श्री.रवींद्र बारस्कर, विरोधी पक्षनेते मा.श्री.संपत बारस्कर, महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती शेळके यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here