सौंदाळा गावातील शिवरस्ते खुले करून ग्रामसेवकाची नियुक्ती करा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू ः पोटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 22, 2021

सौंदाळा गावातील शिवरस्ते खुले करून ग्रामसेवकाची नियुक्ती करा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू ः पोटे

 सौंदाळा गावातील शिवरस्ते खुले करून ग्रामसेवकाची नियुक्ती करा, अन्यथा ठिय्या आंदोलन करू ः पोटे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावात ग्रामसेवक यांची नियुक्ती व सर्व शिव रस्ते खुले न झाल्यास गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांच्या दालनात प्रहार संघटना करणार ठिय्या आंदोलन करणार असल्याचा ईशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी दिला आहे
     जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहारचे सौंदाळा शाखाध्यक्ष गोरक्षनाथ आरगडे यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार रुपेशकुमार सुराणा व गटविकास अधिकारी शेखर शेलार,पोलीस निरीक्षक विजय करे यांना सौंदाळा गावातील सर्व शिव रस्ते खुले करून तात्काळ सौंदाळा गावाला कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्याबाबत या आंदोलनाचे निवेदन देण्यात आले
          याप्रसंगी रघुनाथ आरगडे प्रहार किसान आर्मी प्रमुख प्रहारचे बाळासाहेब खर्जुले जिल्हा संघटक, ज्ञानेश्वर सांगळे जिल्हा संघटक, एडवोकेट पांडुरंग आवताडे जिल्हा सल्लागार, अनिल विधाटे नेवासा तालुका कार्याध्यक्ष, जालिंदर आरगडे नेवासा तालुका सरचिटणीस, अरविंद आरगडे सौंदळा शाखा उपाध्यक्ष, बंडू आरगडे,राजेंद्र चामुटे,शेखर आरगडे,कार्याध्यक्ष, बाळासाहेब आरगडे शाखा मार्गदर्शक, विजय धाकतोडे शाखा सहसचिव, बाळासाहेब ठुबे शाखा समन्वयक, संकेत बोधक शाखा सरचिटणीस,रामदास आरगडे, आप्पासाहेब आरगडे व सौंदाळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
   सौंदाळा गावाला तीन वर्षापासून कायमस्वरूपी ग्रामसेवक नाही भेंडा येथील ग्रामसेवक भिसे यांना सौंदाळा गावचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने आणि ग्रामसेवक भिसे यांच्याकडे अतिरिक्त जास्त कामे असल्याने सौंदाळा गावातील विकास कामांना अडथळा येत आहे तसेच नेवासा तहसीलदार रुपेश सुराणा यांना सौंदाळा गावातील सर्व शिव रस्ते सध्या बंद झाले असल्याने रस्त्यावर काटेरी झुडपे अतिक्रमण रात्री-बेरात्री येण्या-जाण्यासाठी अडचण होऊन शेती मशागतीची कामे शेतमाल ने-आण करण्यास अडचणी येतात पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साठवून रस्ते पूर्णतः बंद झाली यामुळे शेतीच्या कामावर विपरित परिणाम होत आहे शेतकर्‍यांच्या प्रगतीस हे बंद शिव रस्ते अडसर ठरत आहेत सर्व शिव रस्ते तात्काळ खुले करण्याची मागणी तहसीलदार यांना निवेदन देवून करण्यात आली सर्व शिव रस्ते खुले न करून व ग्रामसेवक पद न भरल्यास 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नेवासा गट विकास अधिकारी व तहसीलदार यांच्या दालनात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व सौंदाळा ग्रामस्थ ठिय्या आंदोलन करतील या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार व प्रशासनाची राहील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here