जोशी यांनी आपल्या अभिनयातून शहराचे उंचावले - सपकाळ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

जोशी यांनी आपल्या अभिनयातून शहराचे उंचावले - सपकाळ

 जोशी यांनी आपल्या अभिनयातून शहराचे उंचावले - सपकाळ

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने वृक्षरोपण करुन सिनेकलाकार विद्याताई जोशी यांचा सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्या असलेल्या विद्याताई जोशी यांची बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मराठी मालिकेत प्रमुख भूमिका असलेल्या अभिनेत्रीचे काम करण्यास संधी मिळाल्याबद्दल त्यांचा ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला. जोशी यांचा सन्मान आगळ्या-वेगळ्या पध्दतीने भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये वृक्षरोपण करुन करण्यात आला.
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी जोशी यांचा सत्कार केला. ग्रुपच्या सदस्यांचा वाढदिवस, गौरव सोहळा वृक्षरोपणाने साजरा करण्याचा पायंडा असून, हा सत्कार सोहळा वृक्षरोपण करुन पार पडला. यावेळी रमेश वराडे, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, नामदेव जावळे, अनंद सदनापूर, मेजर दिलीप ठोकळ, विकास भिंगारदिवे, सुमेश केदारे, विनोद खोत, एकनाथ जगताप, सरदारसिंग परदेशी, अजय खंडागळे, विकास निमसे, प्रकाश देवळालीकर, दिलीप बोंदर्डे, रमेश कडूस, भास्कर भालेराव, मनोहर पाडळे, संजय भिंगारदिवे, राजू कांबळे, सुर्यकांत कटोरे, रामनाथ गर्जे, संदिप सोनवणे, मुकेश क्षीरसागर, सुनिल फळे, सत्यजित कस्तुरे, दिनकर धाडगे, सचिन मोहिते, दिपक टाक, दिपक बोंदर्डे, अतुल वराडे, राजू शेख, भावसार, किरण फुलारी, सुनिता वराडे, प्रांजली सपकाळ, आरती बोराडे, लक्ष्मी गायकवाड, अनिता सोनवणे, शिल्पा स्वामी, नुरजहा शेख, संध्या हिक्रे, शमीम शेख, राजेश्वरी नागपूरे, कौशल्या शेळके आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, विद्याताई जोशी या नगर मधल्या हरहुन्नरी कलाकार असून, त्यांनी आपल्या अभिनयातून शहराचे व ग्रुपचे नांव उंचावले आहे. त्या ग्रुपच्या सदस्या असल्याचे सर्वांना अभिमान आहे. आरोग्याप्रती जागृक राहून पर्यावरण संवर्धनासाठी ग्रुपच्या माध्यमातून त्या योगदान देत आहेत. त्या उत्तम अभिनय कलाकार असून, त्यांच्याकडून नवोदित कलाकारांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना विद्याताई जोशी यांनी घरच्या मंडळींनी केलेल्या सत्काराने भारावले आहे. ग्रुपमध्ये सर्वांनी प्रेम व आपुलकीच्या भावनेने प्रोत्साहन दिले. या सत्काराने आनखी जबाबदारी वाढून काम करण्यास प्रेरणा मिळणार आहे. भविष्यात लहान मुलांना अभिनयाचं शिक्षण देऊन नगरमधून चांगले कलाकार घडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या अभिनय नाट्याचे सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
झी युवा मराठी वाहिनीवर होणार्या बाळू मामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत मंगळू या भूमिकेत अभिनेत्रीचे काम करण्यासाठी जोशी यांची निवड झाली आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याचे चित्रिकरण सुरू आहे. तसेच जोशी यांनी सिल्व्हर ओक प्रॉडक्शनच्या ग्लोबल आडगाव या चित्रपटात भूमिका केली आहे. या चित्रपटात उषा नाडकर्णी आणि सयाजी शिंदे यांच्याही मुख्य भूमिका आहेत. लॉकडाऊन असताना कुंकु मारचन या लघुपटात त्यांनी भूमिका केली. या लघुपटाला दादासाहेब फाळके ज्युरी अवार्ड मिळाला आहे. त्यांनी तुमचं आमचं जमतंय तसेच कट्टी बट्टी, या झी युवाच्या मालिकांमध्ये काम केले आहे. तर 25 लघुपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत. तसेच 15 बाल एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत. सर्वोत्कृष्ट लेखनाचे बक्षीस देखील त्यांना मिळाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here