जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुगीचे दिवस - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 12, 2021

जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुगीचे दिवस

 जिल्हा परिषद शाळांना पुन्हा सुगीचे दिवस


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः इंग्रजी माध्यमाचे वाढते फॅड, सीबीएससी पॅटर्न चा बोलबाला,पॅन कार्ड  यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा टिकतील की नाही अशी भीती व्यक्त केली जात होती.  मात्र, डिजिटल युगात जुळवून घेत जिल्हा परिषदेच्या शाळांना ही प्रभावी अध्यापन सुरू केले आहे त्यामुळे अलीकडच्या काळात या शाळांनाही पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. तालुक्यात असंख्य मुलांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेला रामराम ठोकत जिल्हा परिषद शाळेची वाट धरली आहे.
इंग्रजी माध्यम, सीबीएसई, इतकेच नव्हे तर आयसीएसईच्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळावा, यासाठी पालक आपला वेळ, प्रतिष्ठा, पैसा पणाला लावत आहेत. अगदी याचे शैक्षणिक शुल्क न परवडणार्या पालकांनाही आपली मुले इंग्रजी माध्यमात टाकण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, बदलत्या काळाप्रमाणे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा ही बदलत गेला आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी डिजिटल युगाची हातमिळवणी करत संगणकीय शिक्षणाचा आधार घेतला. उच्चशिक्षित तरुण शिक्षकी पेशाकडे वळल्याने जिल्हा परिषद शाळांचे रुपडे पालटत गेले.
ग्रामीण भागातील अगदी पहिलीच्या मुलांचे हात संगणकाशी खेळू लागल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सरस ठरत गेली. आता जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातील मुले प्रवेश घेत आहेत. त्यांची संख्या अलीकडे वाढत असून फक्त नेवासा तालुक्यात आत्तापर्यंत असं की मुलांनी इंग्रजी माध्यमाची हवा खाऊन पुन्हा जिल्हा परिषद शाळेची वाट धरली आहे

लॉकडाउन कालावधीत पालकांना घरी मुलांचा अभ्यास घेण्यात अडचणी आल्या. जिल्हा परिषद शाळांची वाढलेले गुणवत्ता कोरोनामुळे घराजवळील  शाळाच  योग्य, अशी मानसिकता, शाळेतील शिक्षक ऑनलाइन शिक्षणासह मोबाईल नसलेल्या पालकांच्या गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करतात. मराठी माध्यमातील मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून पालक पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळत आहेत
- श्रीमती. सुनिता बेरड

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा उस्थळ दुमाला ता.नेवासा
कोविड 19 च्या संसर्गजन्य काळात जिल्हा परिषद शाळा यांनी ऑनलाइन शिक्षण, ऑफलाइन स्वाध्याय, पालक भेटी यावर भर देऊन खंड पडू दिला नाही. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांकडे वळले असून शाळेतील पटसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
   - संदिप निक्रड
शिक्षक जि.प. शाळा नविन चांदगाव ता.नेवासा

No comments:

Post a Comment