जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या बदल्या अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या बदल्या अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती

 जिल्हा पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या बदल्या अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती'


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचार्‍यांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रकियेस आजपासून सुरुवात झाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आज दिवसभर ही प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या संदर्भामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज साधारणता 200 विनंती बदल्या केलेल्या आहेत असे सांगितले.
नगर जिल्हा पोलीस दलामध्ये जिल्हा अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. यामध्ये विनंती  बदल्यांबरोबरच प्रशासकीय बदल्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्या कर्मचार्‍यांचा तीन वर्ष कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा कर्मचार्‍यांनी विनंती बदलीची मागणी केली आहे. त्याचा प्रामुख्याने विचार आला सुरू झालेला आहे. पोलिस मुख्यालयात ही बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे.  यावेळी अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक बाजीराव  पोवार आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील 14 तालुक्यातील जे कुणी विनंती बदल्या संदर्भातले कर्मचारी आहेत. त्यांना सुरुवातीला प्राधान्य देण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांना विनंती बदल्या कुठे पाहिजेत, याची विचारणा केली. त्यानंतर प्रशासकीय बदल्यांना सुरुवात झाली. दोन दिवस ही बदली प्रक्रिया सुरू राहणार आहे. या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले की प्रशासकीय अडीचशे जणांनी बदल्या केल्या तर   विनंती बदलीसाठी 200 अर्ज सादर  झाले त्या बदल्या मध्ये 250 बदल्या करण्यात आलेले आहे आमच्याकडे साधारणतः 400 अर्ज आले होते असेही त्यांनी सांगितले, नगर जिल्ह्यामध्ये अनेक जागा या रिक्त झालेल्या आहेत त्या जागेवर आपल्याला बाहेर जिल्ह्यातील असलेले कर्मचारी हे नियुक्त करणे आता अधिक सुलभ झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले,  बदली ची प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण केली जाईल असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment