बंद टोलनाक्यावर गावठी कट्ट्याची विक्री. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 3, 2021

बंद टोलनाक्यावर गावठी कट्ट्याची विक्री.

 बंद टोलनाक्यावर गावठी कट्ट्याची विक्री.

स्थानिक गुन्हे शाखेने सापळा लावला...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगरच्या गुन्हेगारी घटनांमध्ये गावठी कट्ट्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अवघ्या काही हजारांना गावठी कट्टयांची विक्री होत आहे. नगर जामखेड रोड वरील बंद टोल नाक्याचा वापर गावठी कट्टा विक्रीसाठी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांचे आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी टाकळी काझी शिवारातील बंद टोल नाक्यावर सापळा लावून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे.
संदीप पोपट गायकवाड (वय 40 रा. जांबूत ता. शिरुर जि. पुणे), भारत भगवा हतागळे (वय 25 रा. गोविंदवाडी तलवाडा ता. गेवराई जि. बीड) अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.या दोघांकडून दोन गावठी कट्टे, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल, असा एकूण 80 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नगर-जामखेड रोडवर बंद असलेल्या पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यांनी छापा घालून दोघांना मुद्देमालासह अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने टोलनाक्यावर साध्या वेशात आणि खासगी वाहनातून गेले. पोलिसांनी तेथे सापळा रचला.टोलनाक्याच्या बाजूलाच बंद असलेल्या एका इमारतीमागे दोघे जण संशयास्पदरित्या थांबल्याचे आढळून आले. ते दोघे तेऊन टेहळणी करीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांना पाहून ते विचलित झाले. मात्र, तोपर्यंत पोलिसांना त्यांना घेराव घालून पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता संदीप पोपट गायकवाड, (वय 40 रा. जाबूत, ता. शिरुर, जि. पुणे) व भारत भगवान हतागळे (वय 25 रा. गोविंदवाडी, तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) अशी त्यांची नावे असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे दोन गावठी बनावटीचे कट्टे, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल असा सुमारे 80 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला असून दोघाही आरोपींना अटक केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गणेश पिंगळे, नानेकर, भाऊसाहेब काळे, विजय कुमार बेठेकर, संदीप घोडके, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवी सोनटक्के,दीपक शिंदे राहुल सोळंकी यांनी या कारवाईत भाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here