देवगड-धामोरी प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामास गती द्या-पंचक्रोशीतील भाविकांची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

देवगड-धामोरी प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामास गती द्या-पंचक्रोशीतील भाविकांची मागणी

 देवगड-धामोरी प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामास गती द्या-पंचक्रोशीतील भाविकांची मागणी

नेवासा- नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड ते धामोरी अशा प्रवरा नदीवरील पादचारी पुलाच्या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील भाविकांनी केली असून याकामी मंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी लक्ष घालून  पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा पंचक्रोशीतील नागरिक करत आहे. पर्यटन विकास निधी अंतर्गत 2017-2018 या वर्षी श्री क्षेत्र देवगड येथील प्रवरा नदीवरील पादचारी पुलाचे काम सुरु झाले होते मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या पुलाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. या पादचारी पुलाच्या कामास गती मिळाल्यास  या परिसरातील धामोरी,बहिरवाडी,गोधेगाव,भालगाव,नेवासा बुद्रुक या परिसरातील भक्तमंडळी व शाळेय विद्यार्थी यांच्यासाठी प्रवरा नदीवरील पादचारी पूल कामधेनु ठरणार आहे देवगड भक्त मंडळ व परिसरातील नागरिकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्यमान जलसंधारण मंत्री श्री.शंकरराव गडाख पाटील यांना सदर रखडलेल्या पुलाचे काम लवकरात लवकर चालू करावे यासाठी निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here