एमआयडीसी पोलिसांच्या सापळ्यात, हनीट्रॅपमधील.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 20, 2021

एमआयडीसी पोलिसांच्या सापळ्यात, हनीट्रॅपमधील..

 एमआयडीसी पोलिसांच्या सापळ्यात, हनीट्रॅपमधील..

महिलांसह एक आरोपी गजाआड.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील बागायतदाराला हनीट्रॅपव्दारे ब्लॅकमेलिंग करणार्‍या वडगाव गुप्ता येथील महिला व तिच्या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी काल सायंकाळी लोणी येथे सापळा लावून अटक केली असून तिच्याकडून शहरात आणखी काही हनीट्रॅपव्दारे कोणाला गंडविले आहे का याची पोलीस माहिती घेत आहे.
नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथे हनीट्रॅप चालविणारी महिला आणि तिला मदत करणारा आरोपी गणेश गिर्हे या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी काल सायंकाळी अटक केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. आरोपी राहाता तालुक्यातील लोणी येथे असल्याची माहिती त्यांना खबर्‍यांद्वारे मिळाल्या नंतर पोलिसांनी सापळा लावल.पाथर्डी तालुक्यातील 42 वर्षीय इसमाला पेंटींगचे मोठे काम देते असे सांगून नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील हनीट्रॅप चालविणार्या महिलेने तिच्या घरी बोलावून घेतले होते. मोठे काम मिळणार असल्याने ते संबंधित महिलेच्या घरी गेले असता तिने जवळीक साधत त्यांच्यासोबत काही फोटो काढले होते. तसेच नवर्याने आपल्याला रंगेहाथ पकडले असल्याचे भासवून फिर्यादी यांना मारहाण देखील करण्यात आली. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैशांची मागणी करण्यात आली. यासाठी पाथर्डी तालुक्यातील गणेश गिर्हे याला मध्यस्थी करण्यास सांगण्यात आले होते. हनीट्रॅप घडलेल्या इसमाने त्यांना दोन लाखांचे प्रत्येकी तीन चेक दिले होते. तसेच त्यांच्याकडून मारहाण करतेवेळी पाच हजार रूपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेण्यात आली होती. आरोपींना दोन लाख पाच हजार रूपये इसमाकडून घेतलेले आहेत, इतर दोन चेक अद्याप आरोपींकडेच आहेत. हा घडलेला प्रकार एमआयडीसी पोलिसांना इसमाने सांगितल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून वडगाव गुप्ता येथे हनीट्रॅप चालविणार्‍या महिलेसह आरोपी किरण खर्डे आणि पाथर्डी तालुक्यातील राघेहिवरे येथील गणेश छगन गिर्हे या तिघांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी फरार झाले होते. एमआयडीसी पोलिस आरोपींचा शोध घेत असताना संबंधित महिला आणि आरोपी गणेश गिर्हे लोणी येथे असल्याची माहिती मिळाली. एमआयडीसी पोलिसांनी सापळा लावून सोमवारी सायंकाळी सहा वाजता त्यांना अटक केली. आरोपी किरण खर्डे मात्र फरार आहे.

No comments:

Post a Comment