कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, करणार...तळतळाट आंदोलन! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 10, 2021

कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, करणार...तळतळाट आंदोलन!

 कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत, करणार...तळतळाट आंदोलन!

पुण्याच्या ‘स्वयंभू’ संस्थेवर मनपा प्रशासन का मेहेरबान? मजुरांच्या पैशांवर ठेकेदारांचा डोळा.नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्वच्छ शहर, हरित शहर... अश्या विविध घोष वाक्यांनी नगरमधील भिंती रंगवल्या जातात. मात्र आरोग्य सेवा चोख दिली जाते का असा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.स्वच्छता कर्मचार्‍यांना दिली जाणारी रोजंदारी आणि प्रत्यक्ष दाखवली जाणारी रोजंदारी यात तफावत दिसते. प्रत्यक्ष कामावर असणारे मजूर आणि हजेरी पुस्तकावरील संख्या यातही फरक असतो. मजुरांच्या पैश्यावर ठेकेदारांचा डोळा आहे. असे मानल्यास त्याचा मनपातील खरा सूत्रधार कोण ?असा प्रश्न पडतो.आरोग्य सेवेत मूलभूत क्रांती हवी अशी अपेक्षा व्यक्त होतांना नगर महापालिकेत मात्र ही सेवा कमकुवत करण्याचा आणि ठेक्याच्या माध्यमातून पैसे कमविण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार होत आहे. मनपाने एक महिन्यासाठी नाले सफाईचा ठेका दिला असतांना तीन महिन्यांपर्यंत हा ठेका चालवला जातो. मजुरांना दिलेल्या मजुरीत तफावत आढळून येते. मजूर संख्येतही तफावत दिसून येते. सर्वात जास्त तक्रारी असतांनाहि मनपा पुण्याच्या स्वयंभू संस्थेवर का मेहेरबान होते,याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कागद, काच, पत्रा वेचक संघटनेने केली असून या प्रकरणी 15 दिवसात संबंधितांवर कारवाई न झाल्यास तळतळाट आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
या संदर्भात माहिती देताना या संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे म्हणाले की, शहरातील साफसफाई व नाले सफाईच्या कामांचा मजुरांचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्ट, पुणे यांना 30 दिवसांसाठी देण्यात आला होता. त्यात प्रत्येक मजुराला दिवसाकाठी 545 रु.याप्रमाणे मजुरी देण्याचा करार करण्यात आला.एक महिन्याचा ठेका परंतु प्रत्यक्षात हा ठेका 3 महिने (जुलै-ऑगस्ट-सप्टेंबर 2020) पर्यंत कार्यरत होता.ठेकेदाराने मजुरांची दाखवलेली संख्या आणि प्रत्यक्ष कामावर असणार्‍या संख्येत तफावत आढळून आलेली आहे.तसेच मजुरांना प्रत्यक्षात देण्यात आलेल्या मजुरीतही फरक असल्याचे दिसते.मजुरांना दरडोई दरदिवशी केवळ 200तर काहीना 300  रु. याप्रमाणे मजुरी दिली असून  कागदोपत्री मात्र 545 रु, इतकी दाखवण्यात आली आहे.हजेरी पुस्तकामध्ये कर्मचार्‍यांची नावे व त्यांच्या सह्या पाहता त्या सर्व संशयास्पद असल्याचे दिसते. अनेक मजुरांकडे चौकशी केली असता रोजंदारी 200-300 असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी जुलै 2020 या महिन्यात 2398 कामगारांच्या मजुरीपोटी 13 लाख 6 हजार 910 रु.,ऑगस्ट 2020 मध्ये 1111 कर्मचार्‍यांच्या मजुरीपोटी 6 लाख 5हजार 495 रु. तर सप्टेंबर 2020 मध्ये 61 कामगारांच्या रोजंदारीपोटी 33 हजार 245 रु. असे एकूण 19 लाख 45 हजार 650 रु.चे  बिल त्यात 2 टक्के आयकर समाविष्ट करून ठेकेदाराने दि.09/09/2020 रोजी मनपात सादर केले. या बिलावर त्याच दिवशी संबंधित अधिकारी, लेखापाल आणि आयुक्तांच्या स्वक्षर्‍या होऊन तातडीने बिल अदा करण्यात आले. ज्या ठेकेदाराच्या कचर्‍याच्या वजनात तफावत,बीफ वर बंदी असतांना देखील त्याच्या टाकाऊ मालाचे वजन कचर्‍यात धरले जाते, एक महिन्याचा ठेका 3 महिन्यांपर्यंत चालवला जातो, स्वच्छता अभियानच्या सर्वेक्षणात ज्या कचरा वेचकांच्या जीवावर 15 गुण मिळवले जातात त्याच मजुरांना कमी मजुरी दिली जाते, शिवाय त्यांच्या संख्येतही तफावत दिसते, इतके सगळे होऊनही मनपा या ठेकेदार संस्थेवर मेहेरबान का? असा प्रश्न पडतो. यासर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी नगर येथील कागद, काच, पत्रा वेचक संघटनेने केली आहे. 15 दिवसात संबंधितांवर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तळतळाट आंदोलन केले जाईल असे संघटनेचे जिल्हा समन्वयक विकास उडाणशिवे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here