बांबू (ग्रीनगोल्ड) शिवाय मानवाला पर्याय नाही-मा. आ. पाशाभाई पटेल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

बांबू (ग्रीनगोल्ड) शिवाय मानवाला पर्याय नाही-मा. आ. पाशाभाई पटेल

 बांबू (ग्रीनगोल्ड) शिवाय मानवाला पर्याय नाही-मा. आ. पाशाभाई पटेल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
कर्जत ः माणसासाठी बनवलेल्या झाडाचाच माणूस दुष्मण बनला असून औद्योगिक क्रांती मुळे काळ जवळ येऊ लागला असताना मानवाला आगामी काळात जगायचे असेल तर बांबू (ग्रीनगोल्ड) शिवाय पर्याय नाही असा विश्वास व्यक्त करताना भविष्यात पाठीवर ऑक्सिजन चे सिलेंडर येऊ नये असे वाटत असेल तर आजच झाडे लावा असा सल्ला कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी कर्जत पंचायत समितीत दिला. कर्जत जामखेड तालुक्यातील निवडक व्यक्तीच्या कार्यशाळेत ते बोलत होते.
कर्जत जामखेड हे दोन्ही तालुके पाणीदार व वृक्ष वल्लीने घनदाट करण्याचे स्वप्न आमदार रोहित पवार व सुनंदाताई पवार यांनी  पाहिले आहे. त्या अनुषंगाने मार्गदर्शन व चर्चा करण्यासाठी कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशाभाई पटेल  व  बांबू उत्पादक कंपनीचे संचालक संजय कर्पे यांच्या उपस्थितीत कर्जत व जामखेड तालुक्यातील काही निवडक अधिकारी वर्ग, निवडक लोकप्रतिनिधी,  सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांचे प्रतिनिधी यांचे समवेत चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनंदाताई पवार यांनी करताना म्हटले की विकासाच्या सात स्तंभावर काम करण्यासाठी कर्जत जामखेड तालुक्यात प्रत्येकी 20 गावे निवडून समृद्ध गाव या अंतर्गत काम सुरू असून पाणलोटाचे 2 कोटी रु खर्च करून काम केले आहे. शिक्षणावर लक्ष देताना बोलक्या शाळासाठी काम सुरू असून अत्यंत वेगळ्या विषयासाठी आजच्या चर्चा सत्राचे  आयोजन करण्यात करण्यात आले आहे व याचा नक्की चांगला लाभ कर्जत जामखेड तालुक्याला होईल. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे,
गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, जामखेडचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, सभापती मनीषा जाधव, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, कर्जतचे सहा. गट विकास अधिकारी रुपचंद जगताप, आदी सह अनेक जण उपस्थित होते.
यावेळी बाबूची उपयुक्तता दाखवत बांबू उत्पादक कंपनीचे संचालक संजय कर्पे किती प्रकारच्या वस्तू बनतात हे दाखवून देत या क्षेत्रात आपण कशा पद्धतीने गेली वीस वर्षे काम करत असून एका व्यक्ती पासून जगात एक नंबर मिळविलेले हॉटेल बनविण्या पर्यत चा जीवन प्रवास सचित्र सर्वापुढे मांडला, त्यांनी दाखवलेल्या प्रेझेंटेशन मुळे उपस्थित सर्व जण अवाक झाले, यानंतर कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशाभाई पटेल यांनी बाबूचे महत्व विशद करताना काढलेले चिमटे, मारलेले फटकारे, मध्येच केलेला मिश्किल विनोद व त्यातूनही अत्यंत गंभीर पणे सर्वाना विचार करायला लावणारा संदेशाने प्रत्येकाला विचार करायला भाग पाडले. पटेल यांनी अत्यंत साध्या सोप्या भाषेत झाडांचे महत्व विशद करताना देवाने माणसाला बनवले माणूस निसर्गातून ऑक्सिजन घेतो आणि व कार्बन सोडतो अशा वेळी कार्बनच्या दुष्परिणामाचा विचार करून माणूस जगावा म्हणून देवाने झाडाची निर्मिती केली व झाडाला कार्बन खायला दिले व ऑक्सिजन सोडण्याचे काम दिले मात्र आज पर्यंत माणसाला जगवणार्या झाडाच्या मुळावर मनुष्य उठला असून यामुळे आता फक्त मास्क लावावा लागत आहे भविष्यात मात्र  माणसाच्या पाठीवर ऑक्सिजनचे सिलेंडर येणार असून ही वेळ येण्या अगोदर आपण जागे झाले पाहिजे  व यासाठी बांबू लागवड हा अत्यंत आवश्यक पर्याय असून याचे महत्व त्यांनी विशद केले. मा. आ. पाशाभाई पटेल यांनी पवारांचा आपल्या बोलण्यातून केलेला गौरव, यातून मांडलेले सत्य व अधून मधून काढलेले चिमटे यामुळे उपस्थित पोटधरून हसत हसत त्यातून दिला जात असलेल्या संदेशातून अंतर्मुख ही झाले. फक्त बाबू पासून सध्या बंगलोर येथे विमानतळ होत असून पवारांनी बारामतीत एक व कर्जत मध्ये एक बांबू चे रिसॉर्ट बांधावे जेणे करून लोकांना याचे महत्व कळेल अशी अपेक्षा त्यांनी सुनंदाताई पवार यांच्या कडे व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अरुण पुरी यांनी मानले.

No comments:

Post a Comment