छिंदम बंधू विरोधात चोरी अ‍ॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 16, 2021

छिंदम बंधू विरोधात चोरी अ‍ॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल

 छिंदम बंधू विरोधात चोरी अ‍ॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखलनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणारा महापालिकेचा बडतर्फ झालेला उपमहापौर श्रीकांत छिंदम यांच्यासह पाच जणांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात जबरी चोरीसह अ‍ॅट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागीरथ भानुदास बोडखे (वय 55 नालेगाव) या ज्यूस टपरीधारकांनी काल छिंदम यांचे विरोधात फिर्याद दिली आहे. छिंदम बंधूंवर मारहाणीचे, शासकीय कामात अडथळा आणणे, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरणे, सामाजिक तेढ निर्माण करणे, इ. गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल असताना पुन्हा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.
दिल्लीगेट येथील जागा मी खरेदी केलेली आहे, तिथे तुझा काय संबंध, असे म्हणत या ठिकाणी असलेल्या टपरी धारकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करत, तसेच जातीवाचक शिव्या दिल्याप्रकरणी शिवद्रोही श्रीपाद छिंदम यांच्यासह पाच जणांविरुद्ध  तोफखाना पोलिस ठाण्यामध्ये अ‍ॅट्रॅसिटीसह विविध कलमाअंतर्गत आज गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे वादग्रस्त छिंदम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आरोपींमध्ये श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे,  यांचा समावेश आहे. 09 जुलै 2021 रोजी 12.30 वाजाण्याच्या सुमारास ही घटना घडली. भागीरथ भानुदास बोडखे हे मजुरी करणारे कामगार दिल्लीगेट येथे ज्युस विक्रीचा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून करत आहे. गिरीष तुकाराम जाधव  (रा.बागरोजा हडको) हे त्यांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत. सुमारे 5 वर्षापासुन भागीरथ बोडखे ज्यूस सेन्टरचे कामकाज पाहत असुन त्याचे मोबादल्यात गिरीष जाधव हे त्यांना दरमहा 1000 रुपये पगार देतात. सदर ज्युस सेन्टरवर भागीरथ यांनी दि 9 जुलै रोजी  शटर  उघडुन बाहेर झाडलोट करून साफसफाई केली व दुकानाचे कामकाज सुरु केले, असता दुपारच्या वेळी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे असे त्या ठिकाणी आले, भागीरथ यांना शिविगाळ करु लागले. त्यांचे सोबत सुमारे 30 ते 40 लोक होते. या ठिकाणी छिंदम याने तेथे एक क्रेन व जेसीबी पण आणला होता. त्यावेळी श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे, राजेंद्र म्याना यांनी  ज्यूस सेन्टरमध्ये धुडगूस घातला व त्या ठिकाणी असलेले साहित्य त्यांनी फेकून दिले होते.
दुकान मालक गिरीष जाधव यांना फोन करुन सदरचा प्रकार भगीरथ यांनी सांगितला असता त्यावेळी गिरीश जाधव यांनी मी बाहेर गावी आहे मी लवकर येईल असे सांगितले. सदरचा प्रकार घडल्यानंतर भागीरथ याने आपल्या पत्नीला व मुलाला या ठिकाणी तात्काळ येण्यास सांगितले होते. मागोमाग ज्यूस सेन्टरच्या पाठीमागील म्हस्के क्लासचा वॉचमन संतोष साठे व माझा मित्र सलिम अहमद शेख हे पण तेथे आले. त्यावेळी श्रीपाद शंकर छिंदम याने येथील भागीरथ याला तुझे सामान उचल, ही जागा मी घेतली आहे, चपला शिवायचे सोडुन हे काम कुठ करतो चामट्या, लई माजला तू असे म्हणाला.  श्रीकांत छिंदम याने सुद्धा त्यास चांभारड्या माजलास का, ताबडतोब सामान बाहेर काढ, अशी जातीवाचक शिविगाळ करुन दमबाजी  केली. त्याच दरम्यान त्यांचे सोबत असलेल्या इतर 2 जणांनी तु जर आत्ताचे आत्ता सामान बाहेर काढले नाही, तर तुला बघुन घेवू, अशी धमकी दिली व शिविगाळ केली.
त्यावेळी ज्युस सेन्टरसाठी लागणारे आवश्यक सामानाची नुकसान होवू नये, म्हणून भागीरथ यांनी त्या सर्वांना विनंती केली की, सामान नविन घेतलेले आहे, मी काढून घेतो, मला थोडा वेळ द्या. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रतिक हा पण त्यांच्या पाया पडत होता. परंतु त्या सर्वांनी त्यांचे काही एक न ऐकता ज्यूस सेन्टर मध्ये उरलेले सामान फेकून दिले व त्यांच्या गल्यात असलेले धंद्याचे 5000 रुपये व यांच्या नातुला सोन्याची चैन घेण्यासाठी आणलेले 25,000 रुपये असे एकुण 30,000/- रुपये श्रीपाद शंकर छिंदम याने काढुन घेतले. तसेच चांभारड्या व्हय बाहेर, असे म्हणून धक्के मारुन त्यांना तेथून हुसकावून दिले. भागीरथ, त्यांची पत्नी व मुलगा असे मागील रस्त्याने मोकळ्या जागेतून मारायच्या भितीने निघुन जात असतांना श्रीकांत शंकर छिंदम, श्रीपाद शंकर छिंदम, महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे यांनी व त्यांचे सोबत असलेल्या 30 ते 40 लोकांनी मिळुन त्यांची दिल्लीगेट ज्यूस सेन्टरची टपरी जेसीबी च्या सहाय्याने तोडून तिचे पत्रे चेपुन तिला तेथुन उचलून मागच्या बाजुला मोकळ्या जागेत टाकून दिले व त्या ठिकाणी नविन पत्र्याची टपरी ही क्रेनच्या सहाय्याने सदर जागेवर ठेवली. अशा एकुण 12 नविन पत्र्याच्या टप-या क्रेनच्या सहाय्याने त्या ठिकानी परिसरात ठेवून ते सर्व लोक निघून गेले. भागीरथ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी 392, 448, 451,143,147,149, 427,504,506, अ .जा. अ ज  2015 चे कलम 3(1) (ी). न र ( श) अशा अट्रोसिटी सह  इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास ढुमे करत आहे.

No comments:

Post a Comment