काँग्रेस पदाधिकार्‍यांशी गैरवर्तन करणार्‍या पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकेंच्या चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांनी दिले आदेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 8, 2021

काँग्रेस पदाधिकार्‍यांशी गैरवर्तन करणार्‍या पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकेंच्या चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांनी दिले आदेश

 काँग्रेस पदाधिकार्‍यांशी गैरवर्तन करणार्‍या पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकेंच्या चौकशीचे गृहराज्यमंत्र्यांनी दिले आदेश

काँग्रेस मोर्चा आणि किरण काळेंना बदनाम करण्याचा डाव
  मनपाच्या राजकारणात शहरामध्ये सर्वपक्षीय एकत्र आले असताना काँग्रेसने सर्वसामान्यांचा आवाज  होत रस्त्यावर उतरून किरण काळे यांच्या निर्भीड नेतृत्वाखाली एल्गार केल्यामुळे अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. यामुळेच याचा राजकीय त्रास वाटणार्‍या शहराच्या तथाकथित नेत्याने काँग्रेस मोर्चाला त्याचबरोबर किरण काळे यांना पोलिसांशी अरेरावी केल्याचा पडद्या आडून खोट्या वावड्या उठवत बदनाम करण्याचा आखलेला डाव फसला आहे. मात्र अशा अडचणींशी संघर्ष करण्याची काँग्रेसची पूर्ण तयारी असून ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये काँग्रेस सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढत राहील असे शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद यांनी म्हटले आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महानगरपालिकेवर शहरातील रस्त्यांच्या खड्ड्यांच्या प्रश्नां संदर्भामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आसूड मोर्चाच्या वेळी काँग्रेस पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांशी गैरवर्तन करणार्‍या तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकेंच्या चौकशीचे गृहराज्यमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आदेश दिले आहेत.
ना. पाटील यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना याबाबत लेखी आदेश दिले असून एक महिन्यामध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने नगर शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी, त्याचबरोबर डीपी रस्त्यांचा प्रकल्प मार्गी लावण्याच्या मागणीसाठी नगरकर जनतेच्यावतीने भव्य आसूड मोर्चा महानगरपालिकेवर काढण्यात आला होता.
यावेळी आयुक्तांच्या दालनामध्ये आयुक्तांची भेट घेण्यासाठी काळे यांच्यासह काँग्रेसच्या महिला पदाधिकारी गेल्या होत्या. यावेळी महिला पदाधिकार्‍यांना पोलिसांनी आयुक्तांना भेटू दिले नाही असा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला होता. त्याच बरोबर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याशी गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सोळंकेंच्या वर करण्यात आला होता. आंदोलनस्थळी सोळंके यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांना तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी धमकी दिल्याचे म्हटले होते. काल रात्री उशिरा काँग्रेस पदाधिकार्‍यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. यामध्ये स्वतः सोळंके हे फिर्यादी आहेत. घडलेल्या घटनेबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांनी गंभीर दखल घेत पोलीस महासंचालकांना उपनिरीक्षक सोळंके यांची तात्काळ चौकशी करण्याचे लेखी आदेश निर्गमित केले आहेत  या संदर्भामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांनी ना. पाटील यांची मुंबईत भेट घेत निवेदन दिले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे हे देखील उपस्थित होते.
काँग्रेसच्या वतीने आसूड मोर्चा हा सनदशीर मार्गाने पार पडत असताना त्याचबरोबर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेतली असताना देखील उपनिरीक्षक सोळंके यांच्या वैयक्तिक गैरवर्तनाच्या भूमिकेमुळे आंदोलनस्थळी वातावरण चिघळले होते. या सर्व प्रकाराला सोळंके हे वैयक्तिकरीत्या जबाबदार आहेत.  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी तसेच सर्व पोलिस प्रशासन हे आपलं कर्तव्य चोखपणे बजावत असून त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका ही काँग्रेस पक्षाची कायम राहिलेली आहे  आणि इथून पुढे देखील राहील अशी माहिती मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, प्रवीण गीते दिली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here