शिवसंपर्क अभियान म्हणजे समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम - शंकरराव गडाख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 19, 2021

शिवसंपर्क अभियान म्हणजे समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम - शंकरराव गडाख

 शिवसंपर्क अभियान म्हणजे समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम - शंकरराव गडाख


कर्जत -
कोरोना महामारीत मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णयांचे सर्वसामान्य जनतेने देखील कौतुक केले आहे. आगामी काळात पक्ष वाढीसाठी सर्वानी मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडावे. शिवसंपर्क अभियान म्हणजे सर्वसामान्य नागरिकांमध्ये जाऊन त्यांची अडचणी, समस्या मार्गी लावण्याचा उपक्रम आहे. कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे, त्यांना दिलासा देण्याचे काम या अभियान अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पक्ष करीत आहे. संघर्ष म्हणजे खरा शिवसैनिक सर्वासमोर उभा राहतो, याचा प्रत्यय शिवसेना पक्षातच आहे,’ असं मतं राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केलं आहे.
शिवसंपर्क अभियान कर्जत येथे सुरू झाले. यावेळी गडाख बोलत होते. गडाख यावेळी म्हणाले की, ग्रामीण भागातील प्रत्येक खर्‍या आणि संघर्ष केलेल्या शिवसैनिकाला महाविकास आघाडीत मानाचे स्थान मिळणारच आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकानी पक्षाचे कार्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य समाजाच्या प्रत्येक स्तरावर पोहच करण्याची जबाबदारी घ्यावी,’ असेही ते म्हणाले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, संपर्क प्रमुख विजय पाटील, सुनील वाकळे, तालुका प्रमुख बळीराम यादव, संजय काशीद, माजी उपसभापती प्रशांत बुद्धिवंत, माजी उपसरपंच अमृत लिंगडे, महिला आघाडीच्या संघटक म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष चंदनबाला बोरा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here