माझ्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामांना १६ कोटी,१७ लक्ष,५७ हजार निधी - विजयराव औटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 3, 2021

माझ्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामांना १६ कोटी,१७ लक्ष,५७ हजार निधी - विजयराव औटी

 माझ्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याच्या कामांना १६ कोटी,१७ लक्ष,५७ हजार निधी - विजयराव औटी

शिवसैनिकांनी नाउमेद न होता काम करा!

मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामे..!
नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी : -

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रस्तावित एशियन डेव्हलपमेंट बँक अर्थसाहित पारनेर व नगर तालुक्यात सन २०१९/२० या वित्तीय वर्षात बॅच २ अंतर्गत पारनेर तालुक्यात ११ कोटी ९३ लाख ३१ हजार रुपयांचा निधी मंजुर झाला असल्याची माहिती विधानसभा मा.उपाध्यक्ष विजय औटी यांनी दिली. 

७ जून २०१९ रोजी आपण राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष असताना तालुक्यामधे कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. याची साक्षीदार तालुक्यातील जनता आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत आपण तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. एशियन बँकेकडून अर्थसहाय्य घेऊन २०१८ पासून तालुक्यातील ६ गावांचे प्रस्ताव ग्रामसभा ठराव, ग्रामसभेमध्ये त्याची मांडणी करुन, कोल्हापूर येथील एजन्सी निवडून, त्याचा सर्वे झाला.  या रस्त्यांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्याने घेतले. त्यामुळे बँकेच्या सर्व बाबींचा राज्य शासनाबरोबरचा करार पूर्ण करून अर्थसहाय्य उपलब्ध झाले. त्यानंतर टेंडर प्रोसेसिंग व आता प्रत्यक्षात कार्यारंभ आदेश मिळाला.याचे मनस्वी समाधान मला असल्याचे विजयराव औटी म्हणाले. पारनेर तालुक्यात जवळ पास १२ कोटी व त्याच बरोबर नगर तालुक्यात देखील ४ कोटी २४ लाख २६ हजार रुपयांचे रस्ते  असे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात एकुण १६ कोटी, १७ लाख, ५७ हजार रुपयांच्या निधीचा कार्यारंभ आदेश मिळाला याचे समाधान आहे सरकार शिवसेनेचे आहे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामे मोठया प्रमाणात मार्गी लागत आहेत, लागतीलही. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हापरीषदेचे सार्वजनिक बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दाते सर व पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके यांची विकासाची घोडदौड चालूच आहे.आम्ही पारनेर नगर विधानसभा मतदार संघातील शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही.शिवसेना व शिवसैनिकांसाठी अविरत काम करणार असल्याचे विजयराव औटींनी बोलताना सांगीतले. तालुक्यातील विकासाची परंपरा खंडित होऊ देणार नाही.यापूर्वीही शिवसनेच्याच माध्यमातुन

पारनेर तालुका विकासाच्या  बाबतीत पुढे होता,राहील. तालुक्यामधे शिवसेनेच्या माध्यमातुन विकासाची मोठी गंगा वाहत असुन,सभापती काशिनाथ दातेसर व सभापती गणेश शेळके यांनी तालुक्यामधे कोट्यावधीची विकासकामे दिलेली आहेत. म्हणुन शिवसैनिकांनी नाउमेद न होता काम करा.यावेळी आपल्या कार्यकाळामधे ज्या कामांची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधुन केली होती.त्यांना आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे पत्रही विजयराव औटींनी सांगीतले.मंजुर झालेल्या कामांची यादी पुढीलप्रमाणे...


१) मावळे वाडी ते गावठी वस्ती रस्ता ४ किलोमीटर एकूण निधी २ कोटी ७९ लाख ८९ हजार

२) अस्तगाव धोकटी ते आमले वस्ती रस्ता २.२० किलोमीटर एकूण निधी १ कोटी ५० लाख ६ हजार

3) जामगाव ते सारोळा अडवाई रस्ता ३.३० किलोमीटर एकूण निधी१ कोटी ८२ लाख १५ हजार

४) जामगाव माता साठे वस्ती ते लोणी हवेली रस्ता ३.३३किलोमीटर एकूण निधी १ कोटी ८६ लाख ६६ हजार

५)रा मा ५८ ते हनुमान वाडी रस्ता २.३८ किलोमीटर एकूण निधी १कोटी ५८ लाख २७ हजार

६)राममा २२२ ते धोत्रे खुर्द रस्ता ३.५० किलोमीटर एकूण निधी २ कोटी ३६ लाख २८ हजार

नगर मतदारसंघ

१) कामरगाव ते विठ्ठलवाडी रस्ता ३.३० किलोमीटर एकूण निधी २ कोटी २४ लाख ७१ हजार

२) निमगाव वाघा ते कापसे वस्ती रस्ता १.३५ किलोमीटर एकूण निधी ९२ लाख ९६ हजार

३) सारोळा कासार ते दरेमळा रस्ता १.७०किलोमीटर एकूण निधी १ कोटी ६ लाख ५९ हजार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here