फोनवरील रेकॉर्डिंग ऐकवण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 6, 2021

फोनवरील रेकॉर्डिंग ऐकवण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार.

 फोनवरील रेकॉर्डिंग ऐकवण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार.


श्रीगोंदा -
विवाहितेशी फोनवर झालेल्या बातचीतीचे रेकॉर्डिंग नवर्‍याला ऐकवीन.! अशी धमकी देत. त्याने त्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या नराधमावर बलात्कार व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा श्रीगोंदा पोलिसांनी नोंदविला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की दिनांक 25 जून रोजी दहा वाजण्याच्या सुमारास नमूद महिलेचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतांना, सदरील इसम त्याच्या स्कॉर्पिओ गाडीतुन पीडितेच्या घरी आला. त्या महिलेला माझ्याबरोबर गाडीत बस नाहीतर, मी तुझ्या पती व मुलास मारून टाकीन. अशी धमकी दिली. भीतीपोटी महिला त्याच्या गाडीत बसली.त्यानंतर त्याने गाडी अहमदनगर ते दौंड रोडवर असलेल्या एका हॉटेलवर थांबवून, त्या महिलेला लॉजवर घेऊन गेला. तुझ्याशी खाजगी बोलायचे म्हणत तिला एका खोलीत नेऊन, त्याने तिच्या अंगाशी लगट करून, पती व मुलास जीवे मारण्याची धमकी दिली व त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला.
पीडित महिलेचे पती फॅब्रिकेशनचे काम करतात. तालुक्यातील मांडवगण येथील एका इसमाचे तिच्या पतीकडे फेब्रिकेशनच्या कामानिमित्त सतत येणे जाणे असे. पतीच्या ओळखीने या विवाहित महिलेची ही या इसमाची ओळख झाली.नेहमीप्रमाणे तो महिलेच्या घरी फोन करून, पती कुठे आहे ? अशी चौकशी करत असे. वारंवार होत असलेल्या फोनद्वारे सदर इसम त्या महिलेला तू तुझ्या पतीला सोडून दे. माझ्या बरोबर रहा. मी तुला कमी पडू देणार नाही. असे बोलत. त्याच्या बोलण्यातून महिलेला शंका उत्पन्न होत होती. मात्र, तिने हा प्रकार तिच्या नवर्‍याला सांगण्याचे धाडस केले नाही. पण हा नराधम रोजच जीवे मारण्याची धमकी देत असल्याने अखेर तीने फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here