अपहरण करून अत्याचार प्रकरणी.. तिघांवर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 31, 2021

अपहरण करून अत्याचार प्रकरणी.. तिघांवर गुन्हा दाखल.

 अपहरण करून अत्याचार प्रकरणी.. तिघांवर गुन्हा दाखल.

राहुरी- मुलीच्या वडिलांनी लग्नाला नकार दिल्यामुळे दोन तरूणांनी राहुरी येथील 18 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिला दीड महिना कोंडून ठेवले. दरम्यान तिच्यावर वेळोवेळी शारिरीक अत्याचार केला. ही घटना 19 जून ते 24 जुलै दरम्यान घडली असुन पिडीतेने राहुरी पोलिस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असुन त्यात एका महिलेचा समावेश आहे.
या घटनेबाबत पीडीत मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 19 जून ते 24 जुलै रोजी दरम्यान घराजवळील ओढ्याने आईकडे जात असताना चेडगाव-ब्राह्मणी जाणार्‍या  कच्च्या रस्त्यावरून यातील आरोपींनी मुलीचे तोंड दाबून तिला उचलून मोटारसायकलवर बसवून तिचे अपहरण  केले. त्यानंतर तिला  तालु केडगाव (नगर) येथील रूमवर नेले. त्या मुलीच्या वडिलांनी तिचे लग्न आरोपीबरोबर लावून दिले नाही. याचा राग मनात धरून आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच इच्छेविरुद्ध शारिरीक अत्याचार केला. त्यानंतर दीड महिना रूममध्ये डांबून ठेवले. वेळोवेळी बलात्कार केला आणि वेळोवेळी मारहाण केली.
मुलीने दि. 29 जुलै रोजी राहुरी पोलीस ठाण्यात येऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र शंकर बर्डे (राण गोरेगाव, ता. पारनेर) त्याच्या सोबत असलेला अनिल नावाचा तरूण आणि रवींद्र शंकर बर्डे याची  चुलत बहीण( रा. केडगाव, ता. नगर) या तिघांवर अपहरण व शारिरीक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रवींद्र शंकर बर्डे याला त्वरित अटक करण्यात आली  इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here