शाळा-महाविद्यालये ही ज्ञान व संस्काराची देऊळ बनावीत ः बोडखे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

शाळा-महाविद्यालये ही ज्ञान व संस्काराची देऊळ बनावीत ः बोडखे

 शाळा-महाविद्यालये ही ज्ञान व संस्काराची देऊळ बनावीत ः बोडखे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
आष्टी ः प्राचीन,मध्ययुगीन आणि आधुनिक काळात ही शाळा-महाविद्यालये ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य अव्याहतपणे करत आलेले आहेत.सद्यस्थितीत सुद्धा विविध नैसर्गिक संकटांना सामोरे जात भविष्यातील उज्ज्वल समाज रचनेमध्ये योगदान देण्याच्या दृष्टिकोनातून शाळा- महाविद्यालये ही पवित्र ज्ञान मंदिरे आहेत. ती संस्कार केंद्र बनवीत अशी अपेक्षा वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी व्यक्त केली.
आष्टी तालुक्यातील धानोरा येथील कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांनी भेट देऊन पाहणी केली.परीक्षा विभागाचे कामकाज पाहुन समाधान व्यक्त केले.या महाविद्यालयाच्या आवारात विविध प्रकारचे केलेले वृक्षारोपन या कामाबद्दल तर प्राचार्य डा. कैलास वायभासे आणि सर्व प्राध्यापक ,
कर्मचार्‍यांचे कौतुक केले.त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास वायभासे यांनी त्यांचा महाविद्यालयाच्यावतीने सत्कार केला यावेळी पत्रकार उत्तम बोडखे बोलत होते. यावेळी प्रा. गहिनीनाथ एकशिंगे,प्रा. राजेंद्र शेलार,भुषण ठाकरे,निसार शेख मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पत्रकार उत्तम बोडखे  म्हणाले, मानवी समाज रचनेमध्ये जडणघडण आणि सुयोग्य वाटचालीमध्ये चांगुलपणा,सचोटी,नैतिकता,
प्रमाणिकपणा,सत्यता आदी मूल्यांची निर्मिती अत्यावश्यक आहे. किंबहुना या मूल्यांची रूजवन युवा अवस्थेमध्ये होणे गरजेचे असून त्यादृष्टीने शाळा महाविद्यालयात युवकांची उपस्थिती आणि त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षक प्राध्यापकांची नितांत गरज आहे असे सांगून शाळा महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्या शासनाने तातडीने भरून विद्यार्थ्यांची भावी पिढी उज्ज्वल आणि मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रनिर्मितीसाठी शासनाने हातभार लावावा अशी आग्रही मागणी यावेळी बोडखे यांनी केली. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयातील प्रा.गहिनीनाथ  एकशिंगे यांनी पत्रकार उत्तम बोडखे यांच्या या भेटीबद्दल त्यांचे महाविद्यालयाच्यावतीने आभार मानले.

No comments:

Post a Comment