पाथर्डी-शेवगांव तालुक्यात राजीनामा सत्र सुरूच अनेक भाजपा पदाधिकार्‍यांचे राजीनामे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, July 11, 2021

पाथर्डी-शेवगांव तालुक्यात राजीनामा सत्र सुरूच अनेक भाजपा पदाधिकार्‍यांचे राजीनामे

 पाथर्डी-शेवगांव  तालुक्यात  राजीनामा सत्र सुरूच अनेक भाजपा पदाधिकार्‍यांचे राजीनामे


 खरवंडी कासार/ प्रतिनिधी- महादेव बटुळे 

प्रितमताई मुंढे यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान न दिल्याने बीडनंतर पाथर्डीतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राजीनामा दिले आहेत तसे पत्र वरिष्ठांना सादर केले आहेत ,एके काळी स्व.  गोपीनाथ मुंढे  साहेब पाथर्डी तालुक्याला मावशी म्हनुन संबोधित पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या पदार्थ पदाधिकाऱ्यांनी आता बीड नंतर पाथर्डी तालुक्यातील राजीनामासत्र सुरू झाले आहे. पाथर्डी तालुक्यातील पंचायत समिती सभापती गोकुळ दौंड यांनी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व सुनिता दौंड यांनी आपला सभापती पदाचा राजीनामा देत म्हणाल्या की मुंडे नावाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाहीत व आमच्या नेत्या प्रीतम ताई मुंडे यांना केंद्रस्थान न दिल्यामुळे मी नाराज होऊन हा राजीनामा दिला आहे भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर भाजपचे उपाध्यक्ष संजय किर्तने सरचिटणीस वामन कीर्तने भाजपचे युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अमोल गर्जे   सचिन पालवे  मच्छिंद्र जायभाये रणजीत बेळगे अर्जुन धायतडक माजी नगरसेवक रामनाथ बंग व विद्यमान नगरसेविका सौ दिपाली बंग यांनी पंकजाताई यांच्या समर्थनार्थ नगरसेवक व इतर पदाचा राजीनामा देणार असल्याने सांगितले अनेक सरपंच उपसरपंच राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.व २० ते २५  कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले आहेत यावेळी पाथर्डी तालुक्यात मध्ये एक संतापाची लाट उसळली आहे भाजप हा शेटजी व भटजीचा पक्ष आहे पक्षासाठी काम करणाऱ्यांना न्याय नाही , भाजप ज्या मुंडे साहेबांनी खेड्यापाड्यात पोहोचली त्यांनाच न्याय नाही व व मुंडे नाव नावाशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही असा कार्यकर्त्यांनी सांगितले व  आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय मिळेल यामुळे आम्ही भाजपचे राजीनामे दिलेत आहेत असे भाजप पदाधिकारी यांनी बोलताना सांगितले

No comments:

Post a Comment