श्रीरामपूर तालुक्यात प्रहार संघटनेचा होतोय विस्तार...!
आगामी काळात ठरु शकतो सक्षम पर्याय..!!
श्रीरामपूर ः श्रीरामपूर तालुक्यातील गावागावात राज्यात शेतकरी व सामान्यांच्या प्रश्नावर आक्रमक चेहरा असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू संस्थापक असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचा झपाट्याने विस्तार होत असून गावागावातील तरुण कार्यकर्ते प्रहारच्या प्रवाहात सामील होत असून दिशाहिन व नेतृत्वहीन झालेल्या श्रीरामपूर तालुक्यात आगामी काळात सक्षम पर्याय म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे.
सन 2017 मध्ये राज्यमंत्री बच्चू कडू यांची नुकतीच तालुक्यातील टाकळीभान गावात झंझावाती सभा झाली होती.तेव्हापासून टाकळीभान येथील तरुण कार्यकर्ते नवाज शेख प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत असून त्यांना जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व युवक तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे यांची साथ मिळत आहे.नवाज शेख हे बच्चू कडू यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
सुरुवातीच्या काळात इतर पक्षांनी प्रहारकडे दुर्लक्ष केले मात्र प्रहारने वेळोवेळी शेतकरी प्रश्नांवर अत्यंत आक्रमक भुमिका घेऊन प्रश्न सोडविले.विशेषकरुन तालुक्यातीत विज प्रश्नावर टाकळीभान येथे शेकडो शेतकर्यांना सोबत घेऊन केलेला रास्ता रोको, युटेक शुगरकडे तालुक्यातील शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे ऊसाचे पेमेंट देण्यासाठी जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी कोरोनाच्या लॉकडाऊन काळात थेट साखर आयुक्तांच्या दालनाच आंदोलन करुन युटेक शुगरवर जप्तीची कारवाई करण्यास भाग पाडले परिणामी युटेक शुगरने शेतकर्यांचे ऊस बिलापोटी थकित असलेले 4 कोटी 61 लाख रुपये शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग केले.त्याचप्रमाणे सन 2020 च्या खरीप हंगामात सोयाबिन उत्पादक शेतकर्यांची बोगस बियाणांमुळे फसवणुक होऊन प्रचंड नुकसान झाले होते त्यावेळीदेखील प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली कृषी आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात बोगस बियाणांची होळी करुन आंदोलन करण्यात आले व प्रहारच्या खमक्या भुमिकेमुळे तब्बल 35 बियाणे उत्पादक कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन श्रीरामपूर तालुक्यातील शेतकर्यांना भरपाई मिळाली होती.अशाप्रकारे प्रहारच्या माध्यमातून अभिजित पोटे व नवाज शेख यांनी वेळोवेळी तालुक्यातील रस्ते,विज,आरोग्य,अपंग,मजूर यांच्या प्रश्नावर आवाज उठवून शासन दरबारी प्रशासकिय यंत्रणेशी लढा देऊन मार्गी लावले.कोणत्याही प्रश्नावर थेट भुमिका घेण्याचे काम प्रहार करत आहे.परिणामी श्रीरामपूर शहरासह तालुक्यात प्रहारकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहिले जात असून शेकडो तरुण कार्यकर्ते प्रहारमध्ये प्रवेश करत आहे.आजच्या घडीला तालुक्यातील पाटपाणी प्रश्नावर कोणताही पक्ष व नेता उघड भुमिका घ्यायला तयार नाही मात्र सध्या बच्चू कडूंकडे जलसंपदा खाते असल्याने तालुक्यातील पाणी प्रश्नावर मंत्रालयात बैठकीचे आयोजन केलेले आहे. तालुक्यातील पाटपाण्याचा प्रश्न प्रहारच्या माध्यमातून सुटला तर तालुक्यातील राजकारणाला कलाटणी देण्याचे काम प्रहार करु शकते.सध्या वरचेवर प्रहारचे संस्थापक बच्चू कडूंचेही श्रीरामपूर तालुक्यात दौरे वाढले आहे.शेतकरी व अपंगांमध्ये एक वेगळे वलय बच्चू कडूंना आहे.जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख,युवक तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे,डॉ.किसन शिंगोटे,दिपक पटारे,रमेश भालके,नानासाहेब तागड,भैरवनाथ कांगुणे आदि तरुण ग्रामीण भागात व सागर दुपाटी,विवेक माटा हे तरुण कार्यकर्ते शहरात तरुणांचे संघटन वाढवून पुर्ण तालुका पिंजून काढत आहे.म्हणून राजकिय जाणकारांच्या मते भविष्यात प्रहार तालुक्यात सक्षम पर्याय निर्माण करणार आहे.
श्रीरामपूर तालुका व शहरात प्रहारचे संघटन मजबूत आहे.आगामी नगरपालिका,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका प्रहार स्वबळावर लढविणार असून आगामी विधानसभा निवडणूकीला जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे उमेदवार असतील.
- नवाज शेख
जिल्हा कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष.
No comments:
Post a Comment