खोटं पण.. रेटून बोल... भाजपा नेत्यांची जुनी सवय. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 10, 2021

खोटं पण.. रेटून बोल... भाजपा नेत्यांची जुनी सवय.

 खोटं पण.. रेटून बोल... भाजपा नेत्यांची जुनी सवय.

आ. रोहित पवारांचा विरोधी पक्षनेते फडणवीसांवर हल्लाबोल..


मुंबई -
खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तसेच दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही असंही म्हटलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर करून भाजपाची चांगलीच पोलखोल केली आहे. खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणार्‍या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपाकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही असही रोहित पवार म्हणाले.
दरम्यान पेट्रोलवर लावण्यात येणार्‍या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामध्ये केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रु मिळत असल्याचे सांगतात असं रोहित यांनी म्हटलं आहे. तसेच विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही असं देखील रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment