अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर... उत्पादन शुल्क व पोलिसांचे संयुक्त छापे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 9, 2021

अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर... उत्पादन शुल्क व पोलिसांचे संयुक्त छापे.

 अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर... उत्पादन शुल्क व पोलिसांचे संयुक्त छापे.

देवळाली परिसरातील 5 अड्ड्यांमधून 1 लाख 82 हजाराचा मुद्देमाल जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात गावठी, हातभट्टी दारूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनेक खेड्यांत या दारूची मोठी उलाढाल होत असते. परमीट रूम, हॉटेलमध्ये मिळणार्‍या महागाड्या दारूपेक्षा कमी किमतीत मिळणार्‍या गावठी दारूच्या फुग्यांना मोठी मागणी असते. या दारूचे शौकिन रोजच फुगे घेऊन दारूचा शौक पूर्ण करतात. देवळाली परिसरातील गावठी व हातभट्टीच्या दारूअड्ड्यांची माहिती प्राप्त झाल्यावर डीवायएसपी संदीम मिटके यांनी एकाचवेळी पोलिसांना 5 ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन, 6240 लिटर, तयार गावठी हातभट्टी दारू 118  लिटर व तसेच 200 किलो नवसागर असा एकूण 1,82,950  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
आशाबाई बाळासाहेब गायकवाड, मयूर अनिल गायकवाड, सतिश वसंत गायकवाड, बापू भास्कर गायकवाड, मंगल बापू गायकवाड,  एक अज्ञात (फरार) (सर्व राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी) यांचेविरुध्द  राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. ही कारवाई  मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक  डॉ. दिपाली काळे, गणेश पाटील, पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क  यांचे मार्गदर्शनाखाली ऊू.ी.ि  संदीप मिटके, ऊू ी.ि. नितेश शेंडे (राज्य उत्पादन शुल्क) पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.

No comments:

Post a Comment