नगर मधील क्रिकेटला आलेली मरगळ दूर करण्यासाठी जयंत येलूलकर यांनी पुढाकार घ्यावा : वसंत लोढा
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर मध्ये विश्व हिंदू परिषदेचे धर्म कार्य उत्कृष्टपणे चालू आहे. अयोध्येतील प्रभुरामाच्या मंदिर निर्माण निधी संकलनात जिल्ह्यातील पादाधीकारींनी फार मोठे काम केले आहे. आता सक्रीय असलेले कार्यकर्ते नवे पदाधिकारी निवडले असल्याने ते जिल्ह्यात परिषदेचे काम वाढवतील. जयंत येलूलकर यांनी साहित्य व क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांनी जसे साहित्य क्षेत्रात चांगले काम केले आहे तसेच त्यांनी नगर मधील क्रिकेटला आलेली मरगळ दूर करून पुन्हा वैभवाचे दिवस आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले.
पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह पदी जयंत येलूलकर यांची निवड झाल्याबद्दल तसेच विश्व हिंदू परिषदेचे नूतन जिल्हा सहमंत्री गौतम कराळे, जिल्हा कोषाध्यक्ष मुकुल गंधे, शहरमंत्री श्रीकांत नंदापुरकर व शेवगाव प्रचारमंत्री सोमनाथ जाधव यांची निवड झाल्याबद्दल चेअरमन वसंत लोढा व टीव्ही मालिका कलाकार मोहिनीराज गटणे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. जयंत येलूलकर म्हणाले, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने असलेली ही पतसंस्था सर्वसामान्यांची हक्कची पतसंस्था आहे. चांगले काम करणार्या या संस्थे कडून झालेला सत्कार जवाबदारी वाढवणारा आहे. कलाकार मोहिनीराज गटणे, गौतम कराळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्याक्रमचे प्रास्ताविक बापू ठाणगे यांनी केले. यावेळी मिलिंद मोभारकर, गजेंद्र सोनावणे, हरिभाऊ डोळसे, दिगंबर गेंट्याल, निलेश चिपाडे, श्री. बडवे, पतसंस्थेचे व्यवस्थापक निलेश लाटे, उपव्यवस्थापक सुखदेव दरेकर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment