मुलांना सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे : आ. काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

मुलांना सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे : आ. काळे

 मुलांना सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे : आ. काळे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः स्पर्धेच्या युगात आज प्रत्येकाला पुढे जायचे आहे मात्र धावपळीच्या जीवनात पालकांना आपल्या मुलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांच्या जबाबदार्‍या निश्चितपणे वाढल्या आहेत. विद्यार्थ्यांना भौतिक सोयी सुविधांबरोबरच योग्य शिक्षण व योग्य संस्कार मिळणे गरजेचे असून शाळा-महाविद्यालयांच्या इमारती बरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता देखील अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कला,विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बेलवंडी बु येथील नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा तसेच विद्यालयाचे प्राचार्य संपतराव पवार यांच्या सेवा पूर्ती प्रसंगी केले. या वेळी अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार होते.
विद्यालयाचे प्राचार्य संपतराव पवार यांनी वाढविलेली शाखेतील स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता आणि एका वर्षात तीन मजली बांधलेली भव्य इमारत करत सर्व ग्रामस्थांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला आणि ग्रामस्थांच्या आणि संस्थेच्या तसेच लोकसहभागातून ही भव्य वास्तु उभा केली ही खरंच कौतुकाची बाब आहे बेलवंडी शाखेप्रमाणेच इतरही शाखा निश्चितच अशाप्रकारे तयार होतील अशी अपेक्षा अध्यक्षीय भाषणात आण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केली. रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, सहसचिव (माध्यमिक) संजय नागपुरे, जनरल बॉडी सदस्य कुंडलीकराव दरेकर, माजी आ.राहुल जगताप,सुभाषशेठ गांधी  यांनी संपतराव पवार यांचा सेवानिवृत्ती जवळच्या काळात अगदी कमी कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले. संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शाखेला देणगी देणार्‍या व इमारत बांधकाम व सुशोभीकरण करणार्‍या सर्वांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी आ. बबनराव पाचपुते(मा.मंत्री), तुकाराम कन्हेरकर (इन्स्पेक्टर, उत्तर विभाग अहमदनगर, सुभाष ठुबे(लाईफ मेंबर), संपतराव शिंदे(पी.आय), अनिल साळुंके(आर्किटेक्ट), रामचंद्र नलगे (बिल्डिंग सुपरवायझर), बाजीराव कोरडे(लाईफ मेंबर), दिनुकाका पंधरकर,  विश्वनाथ थोरात,  सचिनराव लगड, पुरुषोत्तम लगड, दिनेश(आबा)इथापे, उत्तमराव डाके, जयसिंगराव लबडे, संजय डाके,सुभाषराव काळाणे, सवताशेठ हिरवे, सोपानराव हिरवे, विलास कलगुंडे, नवनाथ बोडखे,एम एस लगड, राजेंद्र खेडकर, शिंदे एल बी, रमजान हवालदार तात्याबा हिरवे, गोपीचंद इथापे, दिलीप रासकर, संभाजीराव दरोडे, रायकर सर, बाबळे काकी, सुनील ढवळे, रयत शिक्षण संस्थेतील शाखाप्रमुख, सेवकवृंद, बेलवंडी पंचक्रोशीतील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment