पावसाळ्याच्या स्वागतासाठी तयार रहा ः पप्पू पाटील - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 17, 2021

पावसाळ्याच्या स्वागतासाठी तयार रहा ः पप्पू पाटील

 पावसाळ्याच्या स्वागतासाठी तयार रहा ः पप्पू पाटील


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः पालक, शिक्षक व तरुणांना विनंती आहे की, या कोरोना महामारीच्या काळात आपण जास्त वेळ घरीच असल्याने ही संधी समजून प्रत्येक घरातून कमीत कमी दहा रोपे तयार करावीत असे आवाहन युवा स्फुर्ती प्रतिष्ठाण रामवाडी, मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले की, ही रोपे आपण दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या व इतर टाकाऊ पिशव्यांच्या माध्यमातून तयार करु शकतो, आपण जे फळे खातेा त्यातील बिया, जसे की आंब्याच्या बाळी कोय जांभूळ, चिकू, इत्यादी यापासून सुध्दा मोठ्या प्रमाणात घरच्या घरी रोपे बनवू शकातो रोपे आपण आपल्या कॉलनीमध्ये जवळच्या शेतकर्याना भेट म्हणून देऊ शकतो.
तसेच अनेक मंगल प्रसंगी, जसे की वाढदिवसाच्या, लग्न वाढदिवस व इरत प्रसंगी आपण  रोपे भेट देऊ शकतो. शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत प्रत्येक 5 ते 10 रोपे तयार करण्यास सांगितले गेले तर ते मुलं आनंदाने रोपे तयार करतील त्याच्यासाठी कोरोना काळातील एक चांगला उपक्रम यानिमित्ताने होईल आणि मोठ्या प्रमाणात रोप निर्माण होतील अशी कल्पना सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील यांनी मांडली आहे.
स्वनिर्मीत रोपे  लावण्यामध्ये, दुसर्यांना देण्यामध्ये जो आनंद असतो तो असतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे की, आपण आपल्या पध्दतीने आपापल्या परीने वृक्षारोपनाची तयारी करुन वृक्षारोपनणासाठी पावसाळ्यात तयार रहावे, आपण जर सर्वांनी मिळून असे रोपे तयार केली तर राज्यभरामध्ये लाखो रोपे तयार होऊ शकतात व एक चांगली दिशा मिळू शकते.
वास्तविक पाहाता अनेकदा आपण झाडे लावा आणि झाडे वाचवा असे म्हणतो मात्र, त्यासाठी हा उपक्रम चांगला व सर्वांना करता येणारा आहे. आपण सर्व जन या उपक्रमासाठी तयार राहुन कोरोना संबंधी नियम पाळून उपक्रम हाती घ्यावा असे पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment