डॉ बाळासाहेब शिंदे सामाजिक संस्थाचे विधी सायन्स अकॅडेमीचे उद्घाटन
अहमदनगर ः डॉ. बाळासाहेब शिंदे सामाजिक संस्था च्या वतीने विधी सायन्स अकॅडेमी चे उद्घाटन करण्यात आले. सन 2016 पासून डॉ शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कूल च्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्योग मार्गदर्शन या क्षेत्रात काम करत असून त्यातील पुढील पाउल म्हणजे विधी सायन्स अकॅडेमी. या अकॅडेमी च्या माध्यमातून शहरातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातील 11 वी व 12 सायन्स च्या विद्यार्थ्यासाठी संधी उपलब्ध करण्यात आली आहे. जे विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेत असतील त्यांना पी सी एम व पी सी बी अभ्यासक्रम शिकविला जाणार असून त्याच बरोबर एपसळपशशीळपस व चशवळलरश्र साठी आवश्यक असणार्या गएए व छएएढ प्रवेश परीक्षांची संपूर्ण तयारी मोफत करण्यात येणार आहे. सध्या कोविड च्या प्रादुर्भावामुळे सर्व क्लासेस ऑनलाईन पद्धतीने घेतले जात असून शिक्षणाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे क्लासेस च्या संचालिका सौ. वैशाली शिंदे यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे सचिव व आय एम एस संस्थेचे प्रा विजय शिंदे उपस्थित होते. अधिक माहितीसाठी 9404744509 या क्रमांकावर संपर्क करावा.
No comments:
Post a Comment