शहरातील खड्डे बुजवा; नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

शहरातील खड्डे बुजवा; नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी

 शहरातील खड्डे बुजवा; नगरसेवकांची आयुक्तांकडे मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे त्यामुळे नागरिकांना प्रवास करीत असतात रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच छोटे-मोठे अपघात होऊन दुर्घटना होत आहे.त्यामुळे नगरसेवकाना नागरिकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.तरी लवकरात-लवकर शहरातील खड्ड्यांचे पॅकिंग करण्याची मागणी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, मा.स्थायी समिती सभापती मनोज कोतकर, अजिंक्य बोरकर, नगरसेवक समद खान, भा कुरेशी, अमोल गाडे, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, मा.नगरसेवक बाळासाहेब पवार, निखिल वारे, सतिष शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी आयुक्त शंकर गोरे यांनी नगरसेवकांच्या शिष्टमंडळास सांगितले की, शहरातील खड्ड्यांची पॅकिंग करण्याची प्रक्रिया सुरू केली असून लवकरच खड्डे बुजविण्याचे काम सुरू होणार आहे. पुढील काळात शासनाकडूनच मोठ्या प्रमाणात निधी आणून दर्जेदार रस्त्याचे कामे हाती घेतले जातील, पुन्हा-पुन्हा रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची वेळ महापालिकेला येणार नाही असे काम करू तसेच अमृत भुयारी गटार योजनेमुळे शहरातील गावठाण भागात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे भुयारी गटार योजनेचे कामही मार्गी लागणे गरजेचे आहे.ही जमिनीअंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार नाही असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment