मुरळीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, July 19, 2021

मुरळीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

 मुरळीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणार्‍या मुरळीवर अत्याचार करणार्‍या तीन आरोपींपैकी एक आरोपी आकाश मळुराम पोटे रा.निंबोडी ता.नगर या आरोपीचा  जामीन अर्ज अहमदनगर येथील जिल्हा न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांनी नुकताच फेटाळला आहे.
नगर तालुक्यातील जागरण गोंधळ कार्यक्रम करणार्‍या मुरळीवर तिघांनी आळीपाळीने अत्याचार केला म्हणून कॅम्प पोलीस स्टेशन भिंगारला गुन्हा दाखल आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दि 1 मार्च 2021 रोजी अत्याचारित महिला जागरण गोंधळ कार्यक्रम पार पाडून तिचे घरी वाघ्या बरोबर मोटर सायकल वर जात असताना मध्यरात्री आरोपी व त्याचे बरोबर दोन इसम असे तिघांनी मिळून तिचे असहाय्यतेचा फायदा घेवून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला व त्यांच्याकडे असलेली रक्कम रुपये 9000 काढून घेतले व त्यांना मारहाण केली. म्हणून कॅम्प पोलीस स्टेशन अत्याचारित महिलेने फिर्याद दिल्याने पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 376 (ड), 394, 324, 323, 504, 506 (2) अन्वये गुन्हा दाखल केला व पुढे तपास करून सदर गुन्हा करणारे इसम आकाश मूळराम पोटे व इतर दोन आरोपी निष्पन्न झाल्याने या आरोपीस इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे.
आरोपी आकाश मूळराम पोटे यांचा जामीन मंजूर केल्यास माझे जीविताला धोका होईल. एका निर्जन स्थळी नेऊन रात्रीची वेळ बघून माझ्या असहायतेचा फायदा घेऊन माझेवर आळीपाळीन अत्याचार केलेला असल्याने त्यांना कुठल्याही परिस्थितीत जामीन मंजूर करू नये अशी विनंती अत्याचारित महिलेने अ‍ॅड सुरेश लगड यांचेमार्फत न्यायालयात केलेली होती. विशेष म्हणजे धक्कादायक बाब अशी की, या अत्याचारित महिलेने एका महिला वकिलामार्फत माझ्याकडून गैरसमजूत तिची फिर्याद दिली गेली असल्याने आरोपीस जामीन मंजूर करण्या सारखं नाही असे लिहून दिले होते. अखेर न्यायालयाने वस्तुस्थिती समजावून घेऊन आरोपीकडून मूळ फिर्यादी महिला व साक्षीदार यांच्यावर दबाव येऊ शकतो तसेच आरोपी जामिनावर सुटल्यास तो मिळून येणार नाही. त्यामुळे आरोपीचा जामीन नामंजूर करणे योग्य राहील असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे त्याचप्रमाणे आरोपी आकाश मळुराम पोटे यांचा जामीन जिल्हा न्यायाधीश सौ मंजुषा देशपांडे यांनी नामंजूर केला आहे या प्रकरणात कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस के देशमुख यांची फिर्यादी पक्षास मदत झालेली आहे. याप्रकरणी मूळ फिर्यादी अत्याचारित महिला तर्फे अ‍ॅड सुरेश लगड यांनी काम पाहिले आहे.

No comments:

Post a Comment