महागाई विरोधात काँग्रेस पक्षाचे श्रीगोंद्यात आंदोलन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

महागाई विरोधात काँग्रेस पक्षाचे श्रीगोंद्यात आंदोलन

 महागाई विरोधात काँग्रेस पक्षाचे श्रीगोंद्यात आंदोलन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः केंद्र सरकारने निर्माण केलेल्या कृत्रीम महागाई विरोधात काँग्रेस पक्षाने शहरातील जोतपूर मारुती चौकापासून तहसिल कार्यालयापर्यंत सायकल रैली काढून सरकारचा निषेध करत महागाई त्वरीत कमी करावी व जनतेला दिलासा द्यावा या करिता श्रीगोंदा अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन दिले.
यावेळी केंद्रात मोदी सरकार आल्यापासून सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्कील केले आहे . केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, खाद्यतेल, डाळी, औपचे, खते, बि- बीयाणे यांच्या किंमती प्रचंड वाढल्या असून गोरगरीब जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले आहे. असे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका तथा जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांनी सांगितले.
तर नगराध्यक्ष सौ.शुभांगी मनोहर पोटे यांनी सांगितले की स्वयंपाकाचा गॅस 850 रुपयास झाल्याने सर्वसामान्यांना विकत घेणे मुश्कील झाले असून पुढील काळात जनतेला उपाशी पोटी रहावे लागण्याची देखील शक्यता या महागाईने निर्माण केली आहे असे सांगितले.
काँगेस तालुकाध्यक्ष दिपक भोसले यांनी सांगितले की मोदी सरकरने सत्तेत येण्यासाठी जनतेला वेगवेगळ्या भूलथापा मारल्या परंतू प्रत्यक्षात हे सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र सर्व सामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आली असून महागाई त्वरीत कमी करावी. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या कृत्रीम महागाई विरोधात काँग्रेस पक्ष आंदोलन करीत आहे . या आंदोलनास श्रीगोंदा तालुका शिवसेनेने पाठिंबा दिला. यावेळीप्रशांत ओगले प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस कमिटी, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, नगरसेवक गणेश भोस, प्रशांत गोरे, सतिष मखरे , निसार बेपारी, शिवसेना तालुकाध्यक्ष बाळासाहेब दुतारे, राजेंद्र लोखंडे, सौ. गयाबाई सुपेकर, राकेश पाचपुते, सुरेखाताई लकडे संचालिका नागवडे साखर कारखाना तुळशीराम रायकर, अ‍ॅड. सुनिल भोस, विजयराव कापसे, सुनिल माने सर, बाळासाहेब पाचपूते, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, सरचिटणीस, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस, योगेश मेहेत्रे शहरअध्यक्ष, युवक काँग्रेस, श्रीगोंदा उपस्थीत होते.

No comments:

Post a Comment