पदाच्या माध्यमातून रोहिणी शेंडगे वेगळा ठसा उमटवतील - सुरेखा कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, July 5, 2021

पदाच्या माध्यमातून रोहिणी शेंडगे वेगळा ठसा उमटवतील - सुरेखा कदम

 पदाच्या माध्यमातून रोहिणी शेंडगे वेगळा ठसा उमटवतील - सुरेखा कदम

नूतन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहर आता विकासित होत आहे, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नगर शहराला मिळत आहे. मनपाच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांचे प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. नुतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी प्रभागाच्या विकासात दिलेले योगदान महत्वपूर्ण असून, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. महिलांना महापौर पदाची संधी मिळाल्यास त्याही चांगल्या पद्धतीने काम करु शकतात हे सिद्ध झालेले आहे.. मी महापौर असतांनाही सर्वांच्या सहकार्याने अनेक योजना, प्रश्न मार्गी लावले आहेत. महिलाही राजकारणात आपल्या पदाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटवू शकतात. त्यामुळे रोहिणी शेंडगे  या संधीच्या माध्यमातून नगर विकासात आपले बहुमोल योगदान देतील, असा विश्वास माजी महापौर सुरेखा कदम यांनी व्यक्त केला.
नूतन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांचा सत्कार माजी महापौर सुरेखा कदम यांनी केला. याप्रसंगी नगरसेविका पुष्पा बोरुडे, दिपाली आढाव, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, संजय शेंडगे, शिवाजी कदम, गणेश कवडे, सचिन शिंदे, अनिल बोरुडे, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, बंटी खैरे, संतोष तनपुरे, पप्पू बेद्रे आदि उपस्थित होते. सत्कारास उत्तर देतांना सौ.रोहिणी शेंडगे म्हणाल्या, नगरसेविका म्हणून प्रभागातील विविध विकास कामांबरोबरच अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. आता महापौरपदाची संधी मिळाल्याने नगर शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यास आपले प्राधान्य असेल. विशेषत: महिलांसाठी मनपाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे. माजी महापौर राहिलेल्या नगरसेविका सौ.सुरेखाताई कदम यांचे मार्गदर्शन मला राहिलीच. असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here