पवनचक्की साहीत्य चोरी प्रकरणी जामखेड पोलीसाची कारवाई..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 22, 2021

पवनचक्की साहीत्य चोरी प्रकरणी जामखेड पोलीसाची कारवाई.....

 पवनचक्की साहीत्य चोरी प्रकरणी जामखेड पोलीसाची कारवाई..... 



नगरी दवंडी

जामखेड प्रतिनिधी 

                        दोन दिवसांपुर्वी साकत परीसरातील पवनचक्कीच्या ठिकाणी अज्ञात चोरटय़ांनी केबल व इतर साहित्याची चोरी केली होती. जामखेड पोलीसांना चोवीस तासात चार जणांना अटक करण्यात यश आले असून आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

महेंद्र विष्णु पवार, वय २३, बालाजी बापु काळे, वय-२१ वर्ष , रमेश अशोक शिंदे वय -३८ वर्ष , व उमेश बलभिम काळे वय-२१ वर्ष सर्व रा.आरोळे वस्ती,जामखेड  अशा चार आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. साकत परीसरात व्हिक्ट्रीविंड फार्म सर्विसेस प्रा.लि.या कंपनीच्या पवनचक्कीचे कंट्रोलरूम आहे. दि ७ जुलै रोजी या कंट्रोलरूम मधुन कोणीतरी अज्ञात चोरटयांनी कंपनीच्या केबल्स व सीटी मोड्युल चोरून नेले होते. या प्रकरणी कंपनीचे ज्युनियर इंजिनियर फिर्यादी भुषण युवराज मांडेवाड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर गुन्ह्याचा तपास श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक जामखेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते. गुन्हयाचा शोध करीत असताना पोलीस उपनिरीक्षक थोरात व गुन्हे शोध पथकाने चोरी करणाऱ्या टोळीची खात्रीलायक माहिती मिळाली त्या नुसार आरोपी महेंद्र विष्णु पवार याच्या घरी जावुन पोलिसांनी घरझडती घेतली. यावेळी त्याच्या घरातुन पोलिसांनी ३५ किलो सोललेल्या केबलमधील तांब्याची तार किंमत अंदाजे ३५ हजार रुपयांची तार मिळुन आली. त्याच्याकडे तेथेच चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल करून इतर आरोपी बालाजी बापु काळे, रमेश अशोक शिंदे, उमेश बलभिम सर्व रा.आरोळे वस्ती, जामखेड असे सांगितले. सदर आरोपी यांच्यावर सापळा रचुन त्यांना पकडण्यात गुन्हे शोध पथक जामखेड यांना यश आले. सर्व आरोपींना ताब्यात घेवुन तपासादरम्यान सखोल विचारपुस केली असता आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली व गुन्हयात चोरीस गेलेला इतर मुद्देमालापैकी ६६ हजार रूपये किंमतीचे तांब्याची तार काढुन घेतली सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत.

                         सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील साहेब , मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल साहेब , मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब , यांचे मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड , पोसई राजु थोरात ,पो.कॉ. अविनाश ढेरे, पो.कॉ. संग्राम जाधव ,पो. कॉ.संदिप राऊत ,पो.कॉ. विजय कोळी ,पो. कॉ. आबा आवारे ,पो. कॉ.अरूण पवार ,पो. कॉ. सचिन देवढे  यांनी केली आहे .

No comments:

Post a Comment