पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 31, 2021

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

 पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह उघड..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लग्नाच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचे वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा म्हणजे वधूचे वय 18 वराचे वय 21 पेक्षा कमी असेल तर तो बालविवाह ठरतो. असाच एक बालविवाह करणार्‍यां विरोधात नगर तालुक्यातील खारेकर्जुने या गावात पोलिसांनी मुलगा आई वडील सासू-सासरे या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की मुलगी पंधरा वर्षाची असताना मुलीचा पती आई, वडील, सासु, सासरे यांनी संगनमताने तिचे लग्न लावल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी पुढाकार घेत मुलीचा पती गोरक्ष शिवाजी वाघ (रा-खारेकर्जुने), अल्पवयीन मुलीचे आई, वडील, सासू चंदा शिवाजी वाघ, सासरा शिवाजी वाघ (रा-खारेकर्जुने) या पाच आरोपीं विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध, बाल विवाह विरोधी कायदा, बाल अत्याचार अशा बाबतच्या विविध आईपीसी कलमांव्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगी अल्पवयीन असताना आरोपींनी तिचे लग्न लावले. या दरम्यान ती गर्भवती राहिली. या बाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सदाशिव कणसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नगर ग्रामीणचे  उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी पुढील कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Post a Comment