बोठेला खंडणी देणार्‍या अधिकार्‍यांनी...माझ्या आईच्या हत्येची सुपारी दिली ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 13, 2021

बोठेला खंडणी देणार्‍या अधिकार्‍यांनी...माझ्या आईच्या हत्येची सुपारी दिली !

 बोठेला खंडणी देणार्‍या अधिकार्‍यांनी...माझ्या आईच्या हत्येची सुपारी दिली !

रेखा जरेंचा मुलगा रुणाल जरे यांचा संशय; जिल्हा पोलिस प्रमुखांना दिले निवेदन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रेखा जरे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकार्‍यांना भ्रष्टाचार उघड करण्याची धमकी देऊन खंडणी उकळत होता. माझ्या आईच्या लेटरपॅडवर मोठ्या अधिकार्‍यांच्या विरोधात निवेदन देत होता. माझ्या आईनेही या अधिकार्‍यांच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे या अधिकार्‍यांनीच बाळ मोठे यास माझ्या आईच्या हत्येची सुपारी दिली असावी असा संशय रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनात व्यक्त केला असून या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
रुणाल झरे याने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी आई सौ. रेखा जरे या यशस्वी महिला ब्रिगेड या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा होती. ती या संघटनेच्या माध्यमातून समाजकार्य करत होती. तसेच गैरप्रकारांना आळा घालत भ्रष्टाचार विरोधात लढत होती. याच दरम्यान तिची दैनिक सकाळच्या कार्यकारी संपादक बाळ बोठे यांच्याशी ओळख होवुन मैत्री झाली. दरम्यान त्या सामाजिक कार्य करत असताना त्यांनी अनेक प्रकारचे शासकीय कार्यालयातील गैरकारभारा विरोधात आवाज उठविला होता. हे पाहून बाळ बोठे याने काही शासकीय अधिकार्‍यांच्या भ्रष्ट कारभार व भ्रष्टाचाराविरोधात रेखा जरे यांचे लेटरपॅडवर निवेदने दिली होती. सदर निवेदने दिल्यानंतर तो त्याची दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये मोठी बातमी छापत असेल व सदर अधिकार्‍यांना धमकावत असे. तसेच सदर अधिकार्‍यांना बोठे हा रेखा जरे यांची भीती घालत असे. त्यामुळे सदर अधिकारी घाबरून बोठे सोबत तडजोड करत असत. हे मला आईच्या हत्येनंतर चौकशी व चर्चेतून समजले आहे. दरम्यान दिनांक 30.11.2020 रोजी जातेगाव घाट तालुका पारनेर येथे माझी आई रेखा जरे यांची मारेकर्‍यांकरवी हत्या करण्यात आली. अहमदनगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सदर प्रकरणाचे तपास अधिकारी व ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील साहेब व त्यांचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत सूक्ष्म तपास करत सर्व आरोपींना अटक केली असता, बाळ बोठेकडून सुपारी घेऊन ही हत्या केल्याचे आरोपींनी कबूल केले. त्यानुसार या सर्व आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
दरम्यान घटना झाल्यानंतर बाळ बोठे फरार झाला होता. मात्र अहमदनगर पोलीस दलाने अत्यंत सूक्ष्म रीतीने तपास करून बाळ कोठे याला अटक केली. त्यादरम्यान तपासात त्याने हत्येची सुपारी दिल्याचे कबूल करत रेखा जरे या आपली बदनामी करतील या भीतीने हत्या केल्याचे त्याने कबूल केले. बाळ बोठे मोठ्या दैनिकात संपादक होता. तो सतत वेगवेगळ्या कार्यालयातील अधिकार्‍यांचा भष्टाचार उघडकीस आणून त्यांना धमकावून खंडणी उकळत असे. माझी आई रेखा जरे यांची बारा लाख रुपयांना सुपारी दिल्याचे बाळ बोठे यांनी कबूल केले. मात्र सुपारीची रक्कम कोणी दिली, का दिली याचा तपास अद्याप बाकी आहे. तसे दोषारोपपत्रात स्पष्ट दिसते. या अनुषंगाने मी स्वतः या प्रकरणी सतत चौकशी करत असून माहिती घेत आहे. तसेच या संदर्भात माझी त्यावेळी आईसोबत चर्चा होत असे. तसेच या संदर्भातील काही कागदपत्रे मला मिळाली आहेत. त्यानुसार माझे असे मत आहे की, बाळ बोठे यांनी अधिकार्‍यांविरुद्ध आईच्या लेटरपॅडवर निवेदने दिली तसेच दैनिक सकाळ या वृत्तपत्रात मोठ्या बातम्या छापल्या व सदर अधिकार्‍यांनी बाळ बोठे यास पैसे देऊन माझी आई रेखा जरे यांना गप्प बसविण्यास सांगितले. मात्र आईने गप्प न बसता प्रकरणाच्या चौकशीचा पाठपुरावा चालू ठेवला. त्यात अधिकार्‍याकडून पैसे घेऊन बाळ बोठे याने आईच्या हत्येची सुपारी दिली असावी असे मला वाटते. त्यामुळे त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करून दोषी अधिकार्‍यांवर  गुन्हे दाखल करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

माझ्या आईचा हत्येनंतर आत्ता जे  दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. त्यानुसार अनेक बाबी स्पष्ट होत आहेत. तपासादरम्यान बाळा बोठेच्या घरात, कार्यालयात, आईचे लेटर पॅड सहीसह , इतर काही कागदपत्रेही तपासात हस्तगत झाली.सदर सह्यांबाबत फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार सदर बाळ बोठेकडे सापडलेल्या कागदपत्रांवरच्या सह्या आईच्या नसून बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. या बाबी अलीकडच्या काळात आईच्या लक्षात आल्या होत्या की आईच्या खोट्या सह्या करून अनेक तक्रारी, निवेदने दडपत आहे. व त्यामध्ये फक्त बोठे नसून सदर तक्रार निवेदन ज्या अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आहे तेही यात सामील आहेत किंवा दोषी आहेत.तसेच बाळ बोठे त्यांचे काही सहकारी यामध्ये सामील असून या पंटरमार्फत बोठनेे अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. बाळ बोठे ने तपासात सांगितले की रेखा जरे माझी बदनामी करतील ही भीती मला होती ,पण त्या अनुषंगाने मी जेव्हा सर्व प्रकरण समजून घेतले तर माझ्या असे लक्षात आले की बोटे घातपात करेल असे आईला आधीच लक्षात आले होते. त्यामुळेच आईने हत्येपूर्वी स्वहस्ताक्षरात एक पत्र लिहून ठेवले होते. त्या पत्रात तीने बाळ बोठेचा सगळा बुरखा फाडला होता. यामध्ये बाळ मोठे कशाप्रकारे ब्लॅकमेल करतो, राजकीय पाठबळ कसे मिळतो, स्त्रियांचा कसा वापर करतो अशा अनेक बाबी यात असून बोठे व आई मधील फोनवरील संभाषण सुद्धा रेकॉर्डिंग स्वरूपात असून यातही बोठेने बोलता-बोलता अनेक बाबींचा खुलासा केला. त्यानुसार तो किती मोठा विकृत व्यक्ती आहे हे स्पष्ट होते. बोठे सुरुवातीला क्राईम रिपोर्टर होता. त्यामुळे पोलिस दलाची कामाची पद्धतही त्याला चांगलीच अवगत होती व पोलीस दलात सुद्धा त्याने अनेकांशी मैत्री ठेवली होती. या सर्व बाबींचा गैरफायदा घेऊन बोठेने मोठ्या प्रमाणात अवैद्य मालमत्ता गोळा केली आहे. सरासरी 50 हजार पगार असणारा बोठे अवघ्या 15 ते 20 वर्षात गडगंज संपत्तीचा मालक होतो. व याच अवैद्य संपत्तीचा तो गैरवापर करून गैरकृत्य करतो. तो ज्या पदावर कार्यरत होता त्या पदाचा गैरवापर करून त्याने मोठ्या प्रमाणात अवैध्य मालमत्ता जमवली असून अनेक अधिकारी या निमित्ताने उघडे पडू शकतात व आईची हत्या ज्या बदनामीच्या भीतीने झाली ती बदनामी नेमकी काय हेही स्पष्ट होईल. बाळ बोठेचे मागील पाच वर्षातले मोबाईल कॉल डिटेल्स, मोबाईल लोकेशन व त्यांचे फेसबुक, व्हाट्सअप, यातील चॅटिंग, व्हिडिओज, मेसेज तसेच या दरम्यान  ज्या ज्या अधिकार्‍यांच्या तक्रार निवेदने व  दैनिक सकाळमध्ये मोठ्या बातम्या आल्या .त्या सर्वांचे मोबाईल कॉल डिटेल्स ,मोबाईल लोकेशन, फेसबुक, व्हाट्सअप मेसेज, व्हिडीओ तसेच  बोठे व या सर्वांचे जवळचे नातलग मित्र या सर्वांची कसून चौकशी करावी व सर्वांवर गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणी येत्या पंधरा दिवसात दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास मी  मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण सुरू करेल व यामुळे माझ्या आरोग्याचा अथवा कायदा सुव्यवस्थेला बाधा पोहोचल्यास त्याची सर्व जबाबदारी आपली असेल.

No comments:

Post a Comment