सभापती दाते मुळे ग्रामीण भागात विकास कामांना गती : माजी आमदार औटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, July 7, 2021

सभापती दाते मुळे ग्रामीण भागात विकास कामांना गती : माजी आमदार औटी

 सभापती दाते मुळे ग्रामीण भागात विकास कामांना गती : माजी आमदार औटी

माजी आमदार औटीच्या हस्ते धोत्रे खुर्द येथे रस्त्याचे भूमिपूजन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः धोत्रे खुर्द ता. पारनेर येथे मंगळवार दि. 06 रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (एशियन डेव्हलपमेंट अर्थसहायित) अंतर्गत मंजूर राममा- 222 ते धोत्रे खुर्द रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण करणे-  3.50 किलोमीटर (कामाची अंदाजित रक्कम रु. 2 कोटी 36 लक्ष 28 हजार) रुपयांचा निधी असलेल्या रस्त्याचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे माजी  उपाध्यक्ष माननीय ना. विजय औटी साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना माजी आमदार विजय औटी म्हणाले की पारनेर तालुक्यात ग्रामीण भागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. सभापती दातेमुळे आता विकास कामांना गती प्राप्त झाली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा काशिनाथ दाते सर पंचायत समिती पारनेर चे सभापती गणेश शेळके शिवसेना जिल्हा उपप्रमुख मा रामदास भोसले  शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले पंचायत समिती सदस्या सौ. ताराबाई चौधरी उद्योजक पोपट चौधरी, धोत्रे खुर्द चे सरपंच सौ वनिता कसबे, माजी सरपंच बाबासाहेब सासवडे, चेअरमन हारकु भिटे, ग्रामपंचायत सदस्य जालिंदर भांड,  युवा नेते दीपक भागवत, तिखोल गावचे माजी सरपंच सुभाष राव ठाणगे, ढोकी चे माजी सरपंच बाबासाहेब नर्‍हे उपसरपंच रभाजी भांड, भोसले सर, पप्पू  कसबे, यशोदीप राहणे, सुभाष सासवडे, बाळू नाईकवाडी, पोपट सासवडे, राहुल राहींज, दत्तु रहाणे, नाना कोळेकर, चंदू तागड, पांडुरंग भांड, गणेश बनसोडे, नामदेव गांगुर्डे, अर्चना नायकवाडी, स्वाती नायकवाडी, दुर्गा नायकवाडी, मुक्ताबाई सासवडे, रिंकू सासवडे, मंगल नायकवाडी, सुनिता मिसाळ, नाना बाई सासवडे, या सन्माननीय उपस्थितीमध्ये झाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here