अनिशा हिचा वाढदिवस पारनेरमध्ये विविध उपक्रमांनी साजरा
कोकाटे मित्र परिवाराच्या वतीने कोविड सेंटरला बिसलरी व बिस्कीटचे वाटप
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
पारनेर ः आक्रमक व अभ्यासू खासदार म्हणून ओळख असलेले उच्च शिक्षित व अभ्यासू व्यक्तिमत्व नगर दक्षिण मतदार संघाचे कार्यक्षम खासदार श्री सुजयदादा विखे पाटील यांची कन्या कु. अनीशा हीचा आज जन्मदिन, कुमारी अनिशा हिचा वाढदिवस पारनेर तालुक्यात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला, युवा नेते किरण कोकाटे व त्यांच्या मित्र परिवाराने पारनेर येथील डॉ. श्रीकांत पठारे संचलित कोविड सेंटर मधील रुग्णांना बिसलरी बॉक्स व बिस्कीट चे बॉक्स वाटप करून कु. अनिशा सुजय विखे पाटील हिचा जन्मदिन साजरा करण्यात आला.
खासदार सुजय दादा यांचे कार्य हे तरुणांना प्रेरक असून समाजातील तळागाळातील गरजू लोकांना मदत करण्याची प्रेरणा आम्हाला खासदार साहेबांकडूनच मिळत आहे, व त्यातूनच ही कल्पना आम्हाला आली, असे श्री. किरण कोकाटे यांनी या प्रसंगी सांगितले. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांतजी पठारे यांच्या समवेत स्वप्नील औटी, अजिंक्य देशमुख, अनिकेत साबळे, अमोल ठुबे, व सहकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment