खा. संभाजी राजे यांचा जामखेड येथे मराठा आरक्षण संवाद दौरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

खा. संभाजी राजे यांचा जामखेड येथे मराठा आरक्षण संवाद दौरा

 खा. संभाजी राजे यांचा जामखेड येथे मराठा आरक्षण संवाद दौरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः  जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज हे आठरापगड जमातीमधील मावळ्यांचे होते. तसेच राजर्षी शाहू महाराज यांनी अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी व मराठा समाज असे मिळून 50 % आरक्षण दिले होते. परंतू कालांतराने केंद्र सरकारने नेमलेल्या कही कमीट्यांच्या अहवालामुळे मराठा आरक्षण गेले. आरक्षण ही कायदेशीर प्रक्रिया आहे. मात्र सद्या विकास आघाडी सरकार व भाजप यांच्यामध्ये चाललेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे समाजात गैरसमज होऊन अपप्रकार होऊ नयेत यासाठी मी हा संवाद दौरा काढला असल्याचे प्रतिपादन छत्रपती खा. संभाजी राजे यांनी केले.
राज्य होत असलेल्या मराठा आरक्षण अंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाची सध्यस्थीती, सारथी या संस्थेची सध्यस्थीती, तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या विविध योजना अशा विविध  विषयांवर  प्रबोधन करण्यासाठी  छ. शिवाजी महाराजांचे वंशज, लोकनेते, खासदार छ. संभाजी राजे हे जामखेड येथे आले होते.  शुक्रवार दि. 2 रोजी दुपारी 12 : 30  वाजता नगरपरिषद समोरील प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले.
यावेळी विविध पक्षांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वागत करण्यात आले. भाजपच्या वतीने माजी मंत्री भाजपा राज्य उपाध्यक्ष राम शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी दत्तात्रय वारे,   राहुल उगले(राष्ट्रीय काँग्रेस), संजय काशीद (शिवसेन),  सचिन उगले (प्रहार संघटन) मंगेश आजबे (स्वाभिमानी शेतकरी संघटना) हवा सरनोबत, प्रदीप टापरे (मनसे) यांचा समावेश होता. तर सभापती सूर्यकांत मोरे, विकास राळेभात, ड. अरुण जाधव, शरद शिंदे, ,नामदेव राळेभात, कुंडल राळेभात, पवन राळेभात, प्रा. लक्ष्मण ढेपे, अवधूत पवार, राम निकम आदी मान्यवरांसह  सर्व बहुजन समाजातील नागरिकांनी  मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
तसेच यावेळी शिवश्री छत्रपती श्री संभाजी महाराज यांना जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सन्मान पत्र व जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने खरीप हंगामात पिकणार्‍या पूर उडीद व सोयाबीन या धान्यांचे सॅम्पल देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जामखेड कर्जत विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री मधुकर आबा राळेभात,  जामखेड तालुका अध्यक्ष श्री दत्तात्रय वारे,  पंचायत समिती सभापती सौ राजश्रीताई मोरे व सूर्यकांत नाना मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment