श्रीगोंदा पोलिसांनी दोन मोक्का दरोडेखोरांना ठोकल्या वेड्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

श्रीगोंदा पोलिसांनी दोन मोक्का दरोडेखोरांना ठोकल्या वेड्या.

 श्रीगोंदा पोलिसांनी दोन मोक्का दरोडेखोरांना ठोकल्या वेड्या.

श्रीगोंदा : सहा वर्षांपासून फरार असलेल्या संतोष ऊर्फ वंट्या दिलीप काळे, राहुल भारत चव्हाण (रा. जवळा, ता. जामखेड) या दरोडेखोरांना श्रीगोंदा पोलिसांनी शेडगाव, जवळा येथे कोम्बिंग ऑपरेशन करून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी ही कारवाई गुरुवारी केली. 25 जून रोजी रंजना मारुती भदे (रा. शेडगाव) या महिलेच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून 11 हजारांचा ऐवज लंपास केला होता.संतोष काळे हा जवळा येथील रहिवासी असला तरी गणेशवाडी (ता. कर्जत) येथे राहून दरोडे, चोर्‍या करीत होता. संतोषवर लोणी काळभोर, उरुळी कांचन (जि.पुणे), श्रीगोंदा, जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे; मात्र तो सहा वर्षांपासून फरारी होता. राहुल भारत चव्हाण याच्याविरोधात बारामती व श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, प्रकाश मांडगे, गोकुळ इंगवले, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर यांनी ही कारवाई केली.

No comments:

Post a Comment