इनडोअर, आऊटडोअर जिमसाठी 1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, July 1, 2021

इनडोअर, आऊटडोअर जिमसाठी 1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर

 इनडोअर, आऊटडोअर जिमसाठी 1 कोटी 85 लाखांचा निधी मंजूर

आमदार निलेश लंके यांची माहिती


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः  पारनेर नगर मतदारसंघातील एकूण 37 गावांमध्ये इनडोअर व आउटडोअर  रूपयांचा 1 कोटी 85 लाखांचा निधी मंजुर झाल्याची माहीती आमदार नीलेश लंके यांनी दिली. दोन्ही जिमसाठी प्रत्येकी पाच लाखांंचे साहित्य देण्यात येणार आहेे.
इनडोअर जिमसाठी निवड करण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे : पळसपूर, पिंपळगांरोठा, कोहकडी, यादववाडी, कर्जुलेहर्या, वाडेगव्हाण, वडनेरबुद्रुक, खडकवाडी, वासुंंदे, पाडळीरांजणगांव, सावरगांव, हिवरेझरे, देउळगांवसिद्धी, शिंगवेनाईक, नांदगांव, हिंगणगांव, भोयरेपठार तर देवीभोयरे, नांदूरपठार, ढवळपूरी, वडगांवसावताळ, अस्तगांव, कामरगांव, पारनेर, नेप्ती, शहंजापूर, या गावांमध्ये यापूर्वीच जिम साहित्य सुपूर्द करण्यात आले आहे.
आ:टडोअर जिमसाठी निवडण्यात आलेली गावे पुढीलप्रमाणे : वाळवणे, वनकुटे, नांदूरपठार, टाकळीढोकेश्वर, पोखरी, चास, अकोळनेर, आरणगांव, नवनागापूर, देहरे.
विविध गावांमधील तरूणांनी जिम साहित्याची मागणी केल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाकडे तसा  प्रस्ताव सादर करण्यात आला होता. नियोजन मंडळाच्या बैठकीत सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात येउन लवकरच सबंधित ग्रामपंचायतींकडे जिम साहित्य सुपूर्द करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment