सामाजिक उपक्रमातून सरडे यांनी सामाजिक दायित्व केले सिद्ध ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

सामाजिक उपक्रमातून सरडे यांनी सामाजिक दायित्व केले सिद्ध !

 सामाजिक उपक्रमातून सरडे यांनी सामाजिक दायित्व केले सिद्ध !

भव्य रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबिराचा झाला जिल्ह्यात उच्चांक !


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता. गेल्या अनेक महिन्यापासून सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते . जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेक रक्तपेढी मध्ये रक्ताची कमतरता भासत होती . सरकारी व खाजगी हॉस्पिटल कोरोनाच्या संसर्गामुळे अस्थिर झाले असताना, अनेक वृद्ध मायबाप जनतेला दृष्टी असूनही अल्पदृष्टीचा सामना करावा लागत होता. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पाचशे फळाच्या रोपांचेही वाटप यावेळी करण्यात आले.
ही सामाजिक जाणीव लक्षात घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्याचे  माहिती व प्रसारण खात्याचे अध्यक्ष जितेश सरडे यांनी पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉक्टर मनोहर डोळे यांचे संयुक्त विद्यमाने व स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधत निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सहकार्याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत भव्य नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नारायणगाव येथील डॉक्टर मनोहर डोळे यांची संपूर्ण टीम कान्हूर पठार व देवीभोयरे येथे येत किमान 265रुग्णांची मोफत नेत्रतपासणी केली व 31 रुग्ण नेत्रशस्त्रक्रिया साठी नारायणगाव येथे घेऊनही गेले.
जिल्हा परिषद कान्हुर पठार गटातील अनेक युवक युवती व वृद्ध मायबाप जनतेने या दोन्ही शिबिराचे औचित्य साधून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवला .
गेल्या अनेक दिवसापासून या शिबिराची गरज होती अशी प्रतिक्रिया या भागातून उमटल्या . जिल्हा परिषद तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या सौ .राणीताई निलेश लंके यांच्यासह अनेक मातब्बर नेतृत्वाने या शिबिरासाठी उपस्थिती दर्शविली
अल्पावधीतच आपल्या वक्तृत्वाच्या व कर्तुत्वाचा बळावर राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळवीणारे जितेश सरडे यांच्यावर तरुणाई मोठ्या प्रमाणात आकर्षित झाली आहे .त्यांच्या जन्मदिनी कान्हुर पठार गटात मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचे फलक गावोगावी लावलेले दिसून आले.
देवीभोयरे व कान्हुर पठार येथे नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते . तर देवीभोयरे फाटा येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात नेत्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . पुणे येथील मोरया रक्तपेढीच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दत्ता येवले यांच्या सहकार्याने 133 रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्तदान हे श्रेष्ठदान  हे कोरोणाच्या काळातही दाखवून दिले . आज देशाला रक्ताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांनीही त्या आशयाचे आवाहन केले होते . व लोकमत परिवाराचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधत लोकमतचे पत्रकार भास्करराव कवाद व सर्व सहकारी पत्रकार बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी झालेल्या जिल्ह्यातील रक्तदानात सर्वाधिक रक्तदानाची नोंद सरडे यांच्या वाढदिवसा निमित्ताने पहावयास मिळाली.
या रक्तदानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या रक्तदानात पंढरीची वारी चुकलेले एक 70 वर्षांचे आजोबा ह भ प विजय महाराज मुळे यांनी वारीला जाता आले नाही व एकादशी असल्या कारणाने पांडुरंगाच्या चरणी आपली श्रद्धा व्यक्त करत या वयात ही रक्तदान केले . तसेच कान्हुर पठार जिल्हा परिषद गटातील अनेक युवती युवक व प्राथमिक शिक्षकांचेही या रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणात योगदान लाभले.

माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर प्रेम करणार्‍या जनतेनी देवीभोयरे या छोट्याशा गावातून त्यांच्या शुभ आशीर्वादाने मला राज्यात नेतृत्व करण्याची संधी निर्माण करून दिली व माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भरविलेल्या नेत्रचिकित्सा रक्तदान शिबिरामध्ये भरभरून प्रतिसाद दिला आपले नाते हे सामान्य जनतेची आहे ही शिकवण देणारे माझे राजकीय गुरू आमदार निलेश लंके यांच्या आदर्शामुळे व त्यांच्या सामाजिक कार्याच्या प्रेरणेमुळेच हे शक्य होते . हे माझ्या वाढदिवसाच्या दिनी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले . यापुढील काळातही आमदार लंके यांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या अनेक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी  विविध सामाजिक उपक्रम मी राबवणार  हा माझा मानस आहे . मतदार संघातील सर्व घटकातून तसेच राज्यस्तरीय वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळींनी माझ्या जन्मदिनी मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो !      - जितेश सरडे

No comments:

Post a Comment