वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 6, 2021

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्या

 वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून वैद्यकीय अधिकाऱ्याची आत्महत्यानगरी दवंडी /प्रतिनिधी 

 अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय ४०) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान शेळके यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळून आली असून, त्यात तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

डॉ. गणेश शेळके हे करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते बहिरवाडी (ता. नेवासा) येथील रहिवासी होत. मंगळवारी करंजी येथील उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरु होते. त्यावेळी डॉ. शेळके हे तणावाखालीच असल्याचे जाणवत होते. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना एक कागद व पेन मागितला व उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन घेतला. बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळके यांना आवाज दिला. तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्य वाघ, अरविंद चव्हाण, सतिष खोमणे, भाऊसाहेब तांबे हे घटनास्थळी दाखल झाले. 

गळफास घेवून आत्महत्या करण्याच्या अगोदर डॉ. शेळके यांनी चिठ्ठी लिहुन ठेवली होती. ही चिठ्ठी त्यांच्या हातातच होती. या चिठ्ठीत त्यांनी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसिलदार, कलेक्टर व प्रशासनातील वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आपण आत्महत्या करित असल्याचे लिहिले आहे. वेळेवर पेमेंट न करणे, अतिरिक्त कामाचा भार टाकणे, पेमेंट कपातीच्या धमक्या देणे असे प्रकार वरिष्ठांकडून घडत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here