नेवासा तालुक्यात पावसाचा जोर कायम, बळीराजा सुखावला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 13, 2021

नेवासा तालुक्यात पावसाचा जोर कायम, बळीराजा सुखावला

 नेवासा तालुक्यात पावसाचा जोर कायम, बळीराजा सुखावला


नेवासा -
गेल्या पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने नेवासा तालुक्यात रविवारपासून जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काही प्रमाणात बळीराजा सुखावला गेला आहे.दुबार पेरणीचं संकटही टाळलं गेलं. पहिल्या दिवशीचा जोर दुसर्‍या दिवशीही वरुणराजाने  कायम ठेवला. सोमवारी  संध्याकाळी सहा वाजेपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली .
रविवारी सायंकाळी सात वाजता सुरू झालेला पाऊस  नेवासा फाटा तसेच नेवासा शहर  सोनई  याठिकाणी रात्री अकरा वाजेपर्यंत चालू होता. रात्री दहा नंतर तर विजेचा कडकडाटासह पावसाने एक तास अधिक जोर धरला होता. गावातील सर्व रस्ते व लहान ओढ्यातून पाणी वाहत होते काही ठिकाणी दुकानांमधे पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. ऊस, सोयाबीन, कपाशी या पिकांना पावसाने जीवदान भेटले आहे. तसेच जोरदार पावसाने  हवामानातील उकाडाही आता कमी झाला आहे.परिसरातील ओढे नाले वाहू लागल्याने शेतकर्यांमध्ये आता आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.

पेरण्या झाल्यानंतर उघडीप दिलेल्या पावसाने खूप मोठी चिंता आमच्यासाठी  निर्माण केली होती. परंतु सलग दोन दिवसांच्या या पावसाने आता सर्व चिंता मिटल्या आहेत.वरुणराजाने अशीच कृपादृष्टी कायम ठेवली तर सर्व काही व्यवस्थित होईल.
- बाळासाहेब लिपाणे युवा शेतकरी (सलाबतपूर)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here