श्रीगणेशाच्या आशिर्वाद व सर्वांच्या सहकार्याने नगर विकासात योगदान देऊ - महापौर रोहिणी शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, July 3, 2021

श्रीगणेशाच्या आशिर्वाद व सर्वांच्या सहकार्याने नगर विकासात योगदान देऊ - महापौर रोहिणी शेंडगे

 श्रीगणेशाच्या आशिर्वाद व सर्वांच्या सहकार्याने नगर विकासात योगदान देऊ - महापौर रोहिणी शेंडगे

नूतन महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांचा सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्री विशाल गणेशाने सर्वांच्याच मनोकामना पूर्ण केल्या आहेत. श्री गणेशाच्या आशिर्वाद रुपाने महापौरपदाची संधी आपणास मिळाली आहे. तेव्हा या संधीचे सोने करण्याचा आपण प्रयत्न करु. सर्वांच्या सहकार्याने नगर शहराचा परिपूर्ण व नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहू. प्रत्येक शुभकार्याची सुरुवात ही ग्रामदैवत श्री विशाल गणेशापासून होत असल्याने आपल्या नूतन पदाचा शुभारंभ श्री गणेशाचे आशिर्वाद घेऊन नगर विकासाचा संकल्प आपण करत आहोत. या कार्यात सर्वांचे सहकार्य घेणार असून, प्रत्येकाचे शहराच्या विकासात योगदान असावे, यासाठी एकत्रित प्रयत्नातून आपले शहर विकसित करु. त्यासाठी श्रीविशाल गणेशाचे आशिर्वाद आपल्या पाठिशी असतील, असा विश्वास नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी व्यक्त केला.
महापौर रोहिणी शेंडगे यांचा शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश देवस्थानच्यावतीने सचिव अशोकराव कानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी  पुजारी संगमनाथ महाराज, माजी महापौर सुरेखा कदम, नगरसेविका पुष्पा बोरुडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अशोक कानडे म्हणाले, महापौर हा प्रथम नागरिक असल्याने शहरातील प्रत्येकाचे पालकत्व त्याचे असते. त्यांच्या अडचणी सोडविणे, त्यांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागते. सौ.रोहिणी शेंडगे या आपल्या कार्यकर्तुत्वाने महापौर पदाच्या माध्यमातून नगर शहराला वैभव प्राप्त करुन देतील. श्री विशाल गणेश त्यांच्या चांगल्या कार्यात त्यांच्या पाठिशी राहिली असा विश्वास व्यक्त केला. यावेळी माजी नगरसेवक संजय शेंडगे, माजी शहर प्रमुख संभाजी कदम, अनिल बोरुडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment