सावेडी गावचा एकोपा टिकून - सीए.देवराम बारस्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 7, 2021

सावेडी गावचा एकोपा टिकून - सीए.देवराम बारस्कार

 सावेडी गावचा एकोपा टिकून - सीए.देवराम बारस्कार

सावेडी गावचे भूषण मा.महापौर, नगरसेवक यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सावेडीगाव हे नगर शहराचे नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहे.गावच्या एकोप्याने उपनगराच्या विकासाला चालना मिळाली आहे, सावडी गावातील मा.महापौर, नगरसेवक वेगवेगळ्या पक्षाचे असले तरी विकास कामासाठी एकत्रित येत असतात हा सावेडी गावचा अभिमानाचा भाग आहे.सावेडी गावातील युवकांनी अल्पावधीतच राजकारणामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. याचबरोबर विविध क्षेत्रांमध्ये सावेडी गावातील युवकांनी आपल्या कामाचा ठसा व नावलौकिक केले आहे.गावातील युवकांनी आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामाचा गौरव व्हावा यासाठी सावेडी ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन, सीए देवराम बारस्कार यांनी केले.
सावेडी गावचे भूषण मा.महापौर बाबासाहेब वाकळे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, सभागृहनेता रवींद्र बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगरसेविका आशाताई कराळे, नगरसेविका दीपालीताई बारस्कर, नगरसेविका संध्याताई नगरसेविका मीनाताई चव्हाण, नगरसेवक रामदास आंधळे, मा.नगरसेवक बाळासाहेब पवार यांचा सावेडी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करतांना सीए देवराम बारस्कार समवेत सुरेश वाकळे, अ‍ॅड. महेश काळे,सुरेश बारस्कार,शशिकला भालसिंग, सुमनताई वाकळे,आशा ताई शेळके,शुभांगी बारस्कार आदी उपस्थित होते.
यावेळी सत्कार प्रसंगी मा.महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, सावेडी ग्रामस्थांनी आमचा सत्कार केला आमच्यासाठी सर्वात मोठा बहुमान आहे.यासाठी ग्रामस्थांचे आभार मानतो गेली अडीच वर्षीत सर्वांच्या सहकार्यामुळे महापौरपदाची संधी मिळाली,या संधीचा माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचे काम केले पक्षविरहित काम केल्या मुळेच काम करणार्‍या नगरसेवकांना प्राधान्यक्रम देत निधी उपलब्ध करून दिला, सावेडी उपनगराच्या विकासासाठी मोठा निधी दिला आहे.असेच आपण सर्वजण एकत्रित राहू गावाचा विकास साधू असे प्रतिपादन महापौर वाकळे यांनी केले.
यावेळी बोलताना नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले की,सावेडी गावामुळे सामजिक कार्याची आवड निर्माण झाली आमदार संग्राम जगताप यांनी लोक प्रतिनिधी मधून काम करण्याची संधी दिली त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवूशकलो, सावेडी ग्रामस्थांचे उपकार कधीही विसरू शकत नाही सावेडी उपनगराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत, सावेडी गाव हे एक आमचे कुटुंब आहे असे प्रतिपादन बारस्कर यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम प्रसंगी विविध मान्यवरांची भाषणे झाली यावेळी गावातील विविध मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला यामध्ये संदीप दंडवते, संदीप आडोळे, श्रीनिवास कराळे, सीए ऐश्वर्या देवराम, धरणीधर पाटील, अशोक कोल्हे, आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर बारस्कर यांनी केले.

No comments:

Post a Comment