महागाईचा आगडोंब उसळला - प्रा. विधाते. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

महागाईचा आगडोंब उसळला - प्रा. विधाते.

 महागाईचा आगडोंब उसळला - प्रा. विधाते.

महागाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे दर वाढवून संपुर्ण देशात महागाईचा भडका उडविला आहे. 2014 पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात महागाई करुन ठेवली आले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांना जगणे देखील अवघड झाले आहे. इंधनवर केंद्र सरकारने विविध कर लादल्याने महागाई कमी होण्यास तयार नाही. यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असल्याचे सांगून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या विक्रमी दरवाढीने सर्वसामान्य जनता महागाईने होरपळली जात असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या निषेधार्थ शहरातील जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. महागाई विरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
प्रा. माणिक विधाते यावेळी म्हणाले की, केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले. जनतेची दिशाभूल करुन केंद्र सरकारने जीवनावश्यक इंधनची दरवाढ करुन महागाई वाढवली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असल्याने सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे कठिण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. रेशमा आठरे यांनी गॅस दरवाढीमुळे घरात महिलांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. कोरोनाच्या काळात आर्थिक संकट उभे ठाकले असताना केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेचे जीवण जगणे कठिण केले आहे. असेही ते म्हणाले.
साहेबान जहागीरदार यांनी केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस वर लावलेले त्वरीत मागे घेतल्यास इंधनाचे दर अटोक्यात येऊन महागाई नियंत्रणात येणार असल्याचे सांगितले. संजय सपकाळ व वैभव ढाकणे यांनी भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात महागाई विरोधात सदरचे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, महिला राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे वैभव ढाकणे, क्रीडा सेलचे घनश्याम सानप, केडगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरत गारुडकर, जॉय लोखंडे, नितीन लिगडे, सुनिता पाचरणे, लता गायकवाड, साधना बोरुडे, उषा सोनटक्के, लंकेश चितळकर, तुकाराम कोतकर, विशाल सकट, गणेश बोरुडे, अन्वर शेख, अतुल लवांडे, संतोष ढाकणे, तुलसीदास बोडखे, जय सानप, मनोज आंबेकर, मतीन ठाकरे, रमेश वराडे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment