शहरातील सर्वच प्रभागांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार- महापौर रोहिनीताई शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, July 8, 2021

शहरातील सर्वच प्रभागांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार- महापौर रोहिनीताई शेंडगे

 शहरातील सर्वच प्रभागांना भरघोस निधी उपलब्ध करून देणार- महापौर रोहिनीताई शेंडगे

प्रभाग क्र.15 मधील अचानक वस्ती येथे बंद पाईप गटार पाईपलाईन कामाचा शुभारंभ संपन्न


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील नागरिकांच्या मुलभूत प्रश्नांबरोबरच विकासाचे प्रकल्प राबविणार आहे.शहरातील सर्वच प्रभागाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देऊ.प्रभाग क्रमांक 15 मधील अचानक वस्ती गौतम नगर मधील अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी नागरिकांनच्या घरात घुसत आहे,त्यामुळे नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तूचे नुकसान होत आहे याचं बरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊन साथीचे आजार पसरत आहे. यासाठी प्रभागातील नगरसेवक प्रशांत गायकवाड यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी बंद पाईप गटार योजनेचे काम मंजूर करून घेतले आहे.उर्वरित सर्व प्रश्न या प्रभागातील चारही नगरसेवक सोडवतील भविष्य काळामध्ये अचानक वस्ती ही शहरातील एक विकासाचे मॉडेल ठरेल असे प्रतिपादन महापौर रोहिनीताई शेंडगे यांनी केले.
शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील रेल्वे स्टेशन परिसरातील आदर्श गौतम नगर अचानक वस्ती येथे दलित वस्ती सुधारक योजनेतून बंद गटार पाईपलाईन कामाचा शुभारंभ महापौर सौ.रोहिणी ताई शेंडगे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी नगरसेवक अनिल शिंदे, संभाजी कदम, नगरसेवक प्रशांत गायकवाड, दत्ता जाधव, दीपक खैरे, आकाश निरभवने, बंटी खैरे, अशोक शेळके,तुकाराम मेहेत्रे, मीरा शिंदे, हिराबाई शिंदे, मंगलताई गायकवाड, मनोज गायकवाड, अजय शिंदे, गोकुळ शेळके, अशोक गेवरे,अमोल रणदिवे,मीरा पेटारे,विकास शिंदे, संजीवनी साळवे, विजय साळवे,सतिष साळवे,सुमन दिवरे,कांचन साळवे,सुरेख साळवे, रेखा इंगळे, संदीप राजापूरे, संदेश इंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेवक प्रशांत गायकवाड म्हणाले की, अचानक वस्ती गौतम नगर येथील पावसाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर या वस्तीमध्ये नागरिकांनच्या घरात पावसाचे पाणी घुसत होते,त्यामुळे नागरिकांचे या प्रश्नना मुळे आणोनत हाल होत होते. हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला.या भागाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यापुढील काळात प्रभागातील प्रलंबित प्रश्न देखील मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे असे म्हणले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here