पेयजलची व्यवस्था करून रोटरी क्लबने प्रशंसनीय काम केले - रोटरी क्लबचे प्रांतपाल हरीश मोटवाणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, July 2, 2021

पेयजलची व्यवस्था करून रोटरी क्लबने प्रशंसनीय काम केले - रोटरी क्लबचे प्रांतपाल हरीश मोटवाणी

 पेयजलची व्यवस्था करून रोटरी क्लबने प्रशंसनीय काम केले - रोटरी क्लबचे प्रांतपाल हरीश मोटवाणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः रोटरी क्लब जगातील शेकडो देशात सामाजिक काम करत आहे. नगर मध्येही रोटरी क्लबने खूप चांगले काम उभे केले आहे. पाणी हे जीवन असल्याने सर्वाना शुद्ध पाणी मिळणे अत्यावश्यक झाले आहे. म्हणूनच रोटरी क्लब पाण्याच्या उपक्रमांना प्राधान्य देत आहे. शुद्ध पाण्यचे महत्व जाणून अहमदनगर क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर व त्यांच्या टीमने शाळेला शुद्ध पेयजलची व्यवस्था करून प्रशंसनीय काम केला आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लबचे प्रांतपाल हरीश मोटवाणी यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने महर्षी ग.ज. चीतांबर विद्याल्यालास स्व. अ‍ॅड.बाबासाहेब बोरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या शुद्ध पेयजल युनिटचे लोकार्पर्ण रोटरी क्लबचे प्रांतपाल हरीश मोटवाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी नव विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.रवींद्र साताळकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, संस्थेचे सचिव निलेश वैकर, उपप्रांतपाल मनीष बोरा, प्रशांत बोगावत, उपक्रम प्रमुख महेश गोपालकृष्णंन, रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षा गीता गिल्डा, सेंटरचे अध्यक्ष प्रसन्न खाजगीवाले, प्रीती बोरकर, हर्षवर्धन सोनावणे, मुख्याधीपिका अपर्णा लाड आदींसह शाळेच्या शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविकात निलेश वैकर यांनी शाळेच्या प्रगतीची माहिती देवून या शैक्षणिक संस्थेचे व रोटरी क्लबचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहेत. शाळेतशुद्ध पेयजलची व्यवस्था झाल्याने विद्यार्थ्यांची चांगली व्यवस्था होणार असल्याने सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment