अहमदनगर मनपा सहकारी पतसंस्थेच्या वतीने महापौर व उपमहापौर यांचा सत्कार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, July 6, 2021

अहमदनगर मनपा सहकारी पतसंस्थेच्या वतीने महापौर व उपमहापौर यांचा सत्कार

 अहमदनगर मनपा सहकारी पतसंस्थेच्या वतीने महापौर व उपमहापौर यांचा सत्कारनगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः अहमदनगर मनपा पतसंस्थेला 100 वर्षाची परंपरा असून त्यांनी नेहमीच मनपा कर्मचा-यांचे हित जोपासण्याचे काम केले आहे. सभासदाच्या अडीअडचणीच्या काळामध्ये पतसंस्थेने नेहमीच आर्थिक सहाय्य करण्याचे काम केले आहे. विविध योजनेच्या माध्यमातून सभासदांना लाभ मिळून दिलेला आहे. यापुढील काळातही पतसंस्थेने असेच चांगले काम करावे असे मत महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर महानगर पालिका सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुतन महापौर रोहिणीताई शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांचा सत्कार करताना चेअरमन बाळासाहेब पवार, संचालक बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, शेखर देशपांडे, श्री.बाळासाहेब गंगेकर सतिष ताठे, किशोर कानडे, संचालिका चंद्रकलाताई खलचे तसेच नगरसेवक सचिन शिंदे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, महानगरपालिका पतसंस्थेचा सुरू असलेला कारभार चांगला आहे. सभासदांसाठी सहकार खात्याच्या नियमात बसून विविध विषयांना मंजूरी देवून सभासदांना लाभ दिला जातो. सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेली ही पतसंस्था आहे. संचालकांनी केलेल्या चांगल्या कामाच्या माध्यमातून पतसंस्थेचा नांवलौकिक निर्माण झाला आहे असे ते म्हणाले. यावेळी चेअरमन बाळासाहेब पवार म्हणलेकी, कर्मचारी पतसंस्था व मनपाचे आतुटनाते आहे मनपाचे कर्मचारी हेच पतसंस्थेचे सभासद आहेत,सभासदांसाठी पतसंस्थेने नेहमीच सभासदांसाठी सकारात्मक भूमिका ठेवली आहे. यांना संस्थेच्या वतीने नूतन महापौर व उपमहापौर यांना पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here