नगर अर्बन बँकेला 22 कोटींला फसवले. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 10, 2021

नगर अर्बन बँकेला 22 कोटींला फसवले.

 नगर अर्बन बँकेला 22 कोटींला फसवले.

डॉ. शेळकेस 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 2014 मध्ये “मशिनरी खरेदी” च्या नावाखाली अर्बन बँकेतून 22 कोटी रुपयांचे कर्ज घेवून ते कर्ज अन्य ठिकाणी वापरून बँकेची फसवणूक करणार्‍या डॉ निलेश शेळके यास (तो यापूर्वीच्या एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता) न्यायालयासमोर हजर केले असताना त्यास न्यायालयाने दि 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांनी ही माहिती दिली आहे या प्रकरणातील आरोपींनाही लवकर अटक करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. शेळके हा सध्या इतर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. त्याला आर्थिक गुन्हे शाखेने 22.90 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटक करुन वर्ग करण्यात आले आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. कर्जाच्या रकमेचा वापर कसा झाला? ही रक्कम कुणाकडे गेली, कुणाच्या खात्यात रकमा वर्ग झाल्या, यात आणखी कुणाचा समावेश आहे, याचा सर्व तपास करायचा असल्याने पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती. न्यायालयाने शेळके याला 13 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बँकेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार डॉ. नीलेश शेळके, डॉ. विनोद श्रीखंडे, डॉ. भास्कर सिनारे,  डॉ. रवींद्र कवडे, निर्मल एजन्सीचे योगेश मालपाणी, स्पंदन हेल्थकेअरचे जगदीश कदम यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. नगर अर्बन बँकेतून डॉ.शेळके, डॉ. सिनारे, डॉ. श्रीखंडे यांच्या नावावर प्रत्येकी 5 कोटी व डॉ. कवडे यांच्या नावावर 7.90 कोटींचे कर्ज घेण्यात आले होते. मशिनरी खरेदीसाठी कर्ज घेण्यात आले होते. मात्र, या रकमेतून मशिनरी खरेदी न करता कर्जाची रक्कम इतरत्र वापरल्यामुळे बँकेची फसवणूक झाल्यामुळे हा गुन्हा दाखल झाला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here