दोन शिक्षकांचा काल रात्री अपघाताने जागीच मृत्यू - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, July 3, 2021

दोन शिक्षकांचा काल रात्री अपघाताने जागीच मृत्यू

 दोन शिक्षकांचा काल रात्री अपघाताने जागीच मृत्यू


अहमदनगर ः
पुण्याहून औरंगाबादकडे परतत असताना चारचाकी रस्त्यावरील बंद ट्रेलरला धडकली. या अपघातात चारचाकी मधील दोन शिक्षक जागीच गतप्राण झाले. दोन्ही शिक्षक औरंगाबाद येथील सिडको भागातील रहिवासी होते. हा अपघात काल मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास औरंगाबाद-पुणे महामार्गावरील अहमदनगरजवळ घडला. भानुदास लेंदल वय 40 वर्ष (रा. सारा पार्क सिडको मुकुंदवाडी, औरंगाबाद) आणि चंद्रशेखर ठाकूर असे अपघातात ठार झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. या प्रकरणी प्राथमिक माहिती अशी की, लेंदल आणि ठाकूर हे दोघेही कामानिमित्त गेले होते. काम आटोपल्यावर ते त्यांच्या चारचाकी क्र (एमएच. 20 डीजे. 9695) वरून पुणे-अहमदनगर मार्गे औरंगाबादला येत असताना औरंगाबाद-पुणे महामार्गवर नगर जिल्ह्यातील सुप्याल्या काही किलोमीटर अंतरवर बंद पडलेली ट्रेलर उभा होता. याचा अंदाज न आल्याने चार चाकी ट्रेलरला धडकली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविले असता त्यांची प्राणज्योत मावळली होती. या घटनेची माहिती सिडको परिसरात समजताच एकच शोककळा पसरली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here